कानू मातेला भावपूर्ण निरोप

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-खान्देशचे कुलदैवत असलेल्या कानुमातेला शहरासह जिल्ह्यात वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला वर्ग तसेच पुरुष व बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरात विविध भागातून कारनुमातेची मिरवणूक काढण्यात येऊन पांझरा पात्रात तसेच पात्रातील हत्ती डोहात विसर्जन करण्यात आले. याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पिंपळनेर- येथे कानुमातेचे पांझरानदी पात्रात केले विसर्जन करण्यात आले. काल रात्री खान्देश कानूबाईची सायंकाळी वाजत गाजत घरी चौरंगावर स्थापना करण्यात आली होती.

विद्युत रोषणाई, केळी, कन्हेरच्या पत्रीने देव्हारा सजविण्यात आला होता. रात्री नैवद्य व पुरणपोळीचे जेवण, रोट वाटप करण्यात आले. रात्रभर कानूबाईचे गाणे गात, नृत्यासह जागरण करण्यात आले.

आज कानूबाईचा डोक्यावर देव्हारा घेवून गुलाल उधळत, बॅन्ड, ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली . पांझरेच्या पात्रात सर्व भाविकांनी भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

चिमठाणे- परिसरात कुलस्वामिनी कानुमातेचे वाजत-गाजत महाराणा प्रताप चौकमध्ये नारायांसिंग गिरासे यांच्या घरी कानुमातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. प्राणप्रतिस्टा करण्यात आली आहे. कानुमातेला पाच वर्षे किंवा वाढीव बसवण्याची परंपरा आहे.पाच वर्षे पूर्ण झाले म्हणून कानुमातेचे जलोशात विसर्जन करण्यात आले.

सामोडेे- येथे व परिसरात विविध अहिराणी गाण्यांवर ठेका धरत कानबाईला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.साक्री तालुक्यातील सामोडे गावात दहिते, भदाणे आणि सुतार, लोहार या परिसरात कानबाईची उत्साहात स्थापना करण्यात आली होती. कानबाई पूजन रात्र जागरण आणि आहिराणी लोकगीतातून कानबाईला निरोप देण्यात आला. महिला वर्गाने नटून खटून विविध अलंकार लेव्हन सर्वाथाने सह्या नोेदवून आनंद साजरा व्यक्त करतांना दिसत होत्या.

दहिते, भदाणे आणि सुतार लोहार या परिवारात पुर्वापार कानबाईची परंपरा आहे. दोन दिवस सामोडे गावात भक्तीमय वातावरण दिसत होते. कानबाई, रानबाई कन्हेर याची गाणी म्हणत कानबाईला निरोप देण्यात आला. यात पुरूष वर्गही सहभागी झाला होता.

शेंदवाडे- येथे कानुमातेचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामस्थ कानूमातेच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाजत गाजत कानुमातेला निरोप देण्यात आला. बालगोपाळांनीदेखील गाण्यांवर ठेका धरून कानुमातेला निरोप दिला.

 

LEAVE A REPLY

*