जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घेराव

0
धुळे । दि.16 । प्रतिनिधी-येथील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयात बारावीत 55 टक्केच्या खाली गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येत नसून 35 ते 55 टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र अर्ज विक्री केली जात आहे म्हणून आज महाविद्यालयाच्या प्राचार्यांना युवासेनेतर्फे घेराव घालण्यात आला.  
शहरातील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे.
परंतु 35 ते 55 टक्के गुण मिळविण्यार्‍या विद्यार्थ्यांना अजर्र् विक्री महाविद्यालयातर्फे  सुरूआहे, परंतु त्यांचे प्रवेश अर्ज महाविद्यालय स्वीकारत नाही तसेच असा दुटप्पीपणा जयहिंद सिनिअर महाविद्यालयात सुरु होता.
याबाबत युवासेनेकडे तक्रारी आल्या. त्याची दखल युवासेनेने घेतली व पाठपुरावा केला. 

महाविद्यालयाने अर्ज  स्वीकारल्यानंतर मेरीट लिस्ट लावली जाते, परंतु लिस्ट लागली नाही, अजून अजर्र् स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु असतांना त्यावेळी 55 टक्क्याच्या खाली असलेल्या विद्यार्थ्यांचे अजर्र्च घ्यायचे नाही, ही भूमिका महाविद्यालयाची चुकीची आहे.

युवासेनेच्या माध्यमातून जयहिंद सिनिअर महाविद्यालयाचे प्राचार्य पी.एच. पवार यांना घेराव घालण्यात आला.  घेरावा नंतर प्राचार्य पवार यांनी संबंधीत प्राध्यापकांना सरसकट सर्वांचे अर्ज स्विकारण्याची सुचना दिल्या.

जर कोणत्याही महाविद्यालयाने टक्के कमी आहे, म्हणून अजर्र् स्विकारला नाही. तर युवासेनेला भगवा चौक, शिवसेना कार्यालय येथे संपर्क साधावा.

असे आवाहन युवासेना जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड. पंकज गोरे, ऐश्वर्या अग्रवाल, संदिप मुळीक, हरिष माळी, जितेंद्र पाटील, खुशाल ठाकुर, निलेश चौधरी, सागर मोरे, अजिंक्य मराठे, मयुर बागुल व युवासेना पदाधिकार्‍यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*