‘आधार’विना जननी सुरक्षा झाली ‘निराधार’

0
धुळे । दि.28 । प्रतिनिधी-खासगी तसेच सरकारी योजनांसाठी शासनाने आधार कार्ड सक्तीचे केले आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड लिकींग करण्यात येत आहे.
मात्र, आधार कार्ड नसल्याने जिल्ह्यातील 2907 महिलांना जननी सुरक्षा योजनेपासून वंचित रहावे लागले आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू होतो. तसेच नवजात अर्भकही मृत्यूमुखी पडण्याच्या घटना समोर आल्या.
यानंतर राज्य सरकारने जननी सुरक्षा योजना सुरु केली आहे. यात जिल्ह्यात 10 हजार 152 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

माता मृत्यू, अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी जननी सुरक्षा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत 2016-17 या वर्षात दहा हजार 152 प्रसुती करण्यात आलेल्या गरोदर महिलांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू होतो. तसेच नवजात अर्भकही मृत्युमुखी पडण्याच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने जननी सुरक्षा योजना सुरु केली.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती तसेच दारिद्य्र रेषेखालील गरोदर महिलांची प्रसुती करण्यात येते. गरोदर महिला घरी बाळंत झाल्यास दारिद्य्र रेषेखालील महिलेला 500 रुपये, संस्थेत बाळंत झाल्यास ग्रामीण भागात 700 रुपये, शहरी भागात 600 रुपये तसेच सिझरिन झाल्यास 1500 रुपये देण्यात येतात. जिलह्यिात 2006 पासून ही योजना राबविण्यात येत आहे.

जननी सुरक्षा योजनेचे सन 2016-17 या वर्षात 10 हजार 152 गरोदर मातांना लाभ देण्यात आला आहे. यात एमसीएसटी लाभार्थी आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील एक हजार 636 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील 3744 लाभार्थ्यांपैकी 3549 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

तर धुळे ग्रामीणमधील 2311 लाभार्थ्यांपैकी 1697 लाभार्थी आहेत. साक्री तालुक्यात 2494 लाभार्थ्यांपैकी 3271 लाभार्थी, शिंदखेडा तालुक्यात 2710 पैकी 1636 लाभार्थ्यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ झाला.

असे एकूण 13 हजार 59 लाभार्थ्यांपैकी दहा हजार 152 लाभार्थ्यांना 70 टक्के लाभ देण्यात आला. मात्र, यातील ज्या महिलांनी जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जमा केले नाही.

अशा 2907 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. यासाठी शासनस्तरावरुन महिलांच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*