जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती द्या ! – जिल्हाधिकारी

0
धुळे । दि.21 । प्रतिनिधी-जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या अभियानाच्या माध्यमातून करावयाच्या कामांना गती द्यावी.
दिलेल्या मुदतीत कामांची पूर्तता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी उपवनसरंक्षक जी. के. अनारसे, उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये (रोहयो), शुभांगी भारदे (पुनर्वसन), सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, रेवती कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे जलयुक्त शिवार अभियानातील 2016- 2017 या वर्षातील कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण केली पाहिजेत. याबाबतचा दैनंदिन आढावा घेण्यात येईल. तसेच या अभियानातील कामांची ऑनलाइन माहिती अपडेट केली जावी.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी 2017- 2018 करीता प्रस्तावित कामे, कामांची सद्यस्थिती, प्रगतीत असलेली कामे, आराखड्यातील कामे याविषयी आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*