गुड्ड्या हत्त्या प्रकरणाचे धागेदोरे जळगावात

0
धुळे। दि.2 । प्रतिनिधी-कुख्यात गुंड गुड्डया हत्ये प्रकरणी संशयीत मारेकरी व मारेकर्‍यांना आश्रय देणारे असे एकूण 16 संशयीत गजाआड झाल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी आता शेजारील जिल्ह्यांमध्ये तपासकार्य सुरु केले आहे.
डीवायएसपी हिम्मतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज काही पथके जळगाव जिल्ह्यात तपास कार्यासाठी गेली होती. पथकाला नेमकी काय माहिती प्राप्त झाली याबाबत समजू शकले नाही.

मात्र जळगाव शहराला लागुन असलेल्या काही गावांमध्ये या पथकाने या घटनेशी संबंधित माहिती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

गुड्डया हत्येप्रकरणी काही संशयीत आरोपी हाती लागले असले तरी मारेकर्‍यांपैकी दोन संशयीत आरोपी अद्याप फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत.

आज डीवायएसपी हिम्मतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली जळगावकडे पथके गेली होती. रात्री उशिरापर्यंत पथके जळगाव शहर व लगतच्या गावांमध्ये गुड्डया हत्यासंदर्भातील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत होते.

नेमकी काय माहिती पथकांना मिळाली हे समजू शकले नाही. गुड्डयावर अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे शेजारील जिल्ह्यांच्या पोलीस ठाण्यांमध्येही गुड्डया वॉन्टेड होता.

त्याचे इतर जिल्ह्यातील कोणाशी संबंध होते. मारेकरी आणि गुड्डया या दोघांचे या भागात संपर्कात कोण होते. मारेकर्‍यांकडचे हत्यारे नेमके कुठे आहेत. यासंदर्भातला तपास पथके करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*