शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  प्रवेश प्रक्रिया सुरु

0
 धुळे । दि.23 । प्रतिनिधी-राज्यभरात शासकीय व खासगी आय.टी.आय.मधील प्रवेश प्रक्रिया 19 जूनपासून सुरु करण्यात आली असून यावर्षी देखील केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश अर्ज शासनाच्या  संकेतस्थळावर भरता येणार आहेत, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 

प्राचार्यांनी म्हटले आहे, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत ठरविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 2 जुलै 2017 पर्यंत  ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे, 3 जुलै 2017 पर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करणे, 4 जुलै पर्यंत प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे, तर प्राथमिक गुणवत्ता यादी 6 जुलै 2017 व गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविण्यासाठी 6 ते 7 जुलै मुदत ठरविण्यात आलेली आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवपूर या संस्थेत यावर्षी विविध 20 व्यवसायांमध्ये 968 जागांकरीता प्रवेश दिले जाणार आहेत.

संस्थेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शनासाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष तसेच अर्ज निश्चिती व स्वीकृतीसाठी विशेष कक्ष उघडण्यात आले असून अधिकाधिक उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*