धुळे जिल्ह्यात योगदिन उत्साहात – Photo Gallery

0
बोराडी । दि.21 । वार्ताहर-जिल्हात विविध शाळा, महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्याशिके केलीत.

वाघाडी ना.कु.गुरुजी विद्यालयात- शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील विद्यालयात योेग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी योगासचे प्रात्यक्षिक एस. पी.बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एम.पाटील,व्ही एम पाटील, पी.व्ही.चव्हाण,डी व्ही देवरे, यू. वाय. पाटील, सी.ए. पाटील, व्ही.एन.चित्ते,आर.के. राजपूत, निकुंभ आदींनी परिश्रम घेतले.

बोराडी बनुमाता विद्यालय- येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. ए. बोरसे होते. यावेळी उपशिक्षक सी.एस. बडगुजर यांनी प्रात्यक्षिके तसेच योगासनाचे महत्त्व सांगितले. यावेळी पर्यवेक्षक एस.आर.बडगुजर, सी.एम. कुलकर्णी, एन. एम. सोनवणे, जी. सी . भामरे, टी. टी. ढोले, वैशाली बोरसे, बी.एन, ठाकरे, धैर्यशील चव्हाण, संजय अहिरे, निरज निकम, उपस्थित होते.

जोतोडा म. फुले व डॉ.आंबेडकर विद्यालय- जिभाऊ पौलादसिंग दगेसिंग राजपूत सेमी इंग्लीश स्कुल येथे योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी चेअरमन श्री. उदेसिंग, उपसभापती जगतसिंग राजपूत, सरपंच देवेन्द्र राजपूत, मुख्याद्यापक आर.एस.पाटील, प्राचार्या शारदा मराठे आदी उपस्थित होते. यावेळी क्रिडाशिक्षक आर.सी.सिसोदे, पराडके यांनी योगदिनाचे महत्व सागितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही.व्ही.सोनवणे, बी.व्ही. गिरासे, पी.बी.राऊळ, बागल,एस.सी. शिरसाठ, मनिषा पाटील, चेतन चव्हाण, वृषाली ढिवरे, रुबीना गिरासे, पुनम पाटील, भारती कंखरे आदींनी सहकार्य केले.

बोराडी कर्मवीर इंग्लिश मेडीयम स्कूल- येथील कर्मवीर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जी. ओ. पाटील, प्राचार्य पल्लवी पवार, उपप्राचार्या सविता वाल्हे, ललीता पावरा, प्रकाश वाल्हे, रूपाली जाधव, गौरव चौधरी, देवेंद्र बडगुजर, निजामुद्दीन शहा, विजय धनगर, पावरा, एन. टी. मिस्तरी आदीं उपस्थित होते.

मालपूर विद्यालयात योग दिन- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अ. मो. बागुल विद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.डी.कागणे आदीसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

तर्‍हाडी विद्यालयात योग दिन- येथील साहेबराव सोमा पाटील विद्यालयात योग दिनी पाचवी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी डी.बी.पाटील, ए.एम.सोनवणे यांनी योगाचे प्रात्यक्षिके केलीत. आर.एस.चव्हाण यांनी योगाचे फायदे विषयी माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, सुभाष भामरे, मुख्याध्यापक एन.एच.कश्यप, ए.के.पाटील, व्ही.डी.पाटील, बी.ए.मराठे उपस्थित होते.

थाळनेर येथे योग दिन- येथील संत गाडगे महाराज विद्यालय द.ता.पवार महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पतंजली योगपीठ,भारत स्वाभिमान न्यास युवा भारत, किसान पंचायत, महिला पतंजली योग समिती शिरपूर तसेच स्वामी रहामदेवजी बाबा यांच्या संकल्पनेतून योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पतंजली योग पीठाचे कल्याण सोनवणे, अनिल बोरसे आले होते. योग शिबिरात पाचवी ते बारावी पर्यंतचे 700 विद्यार्थी व विद्यालयाचे शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमात प्राचार्य एस.डी.पाटील यांनी योग मार्गदर्शकांचा सत्कार केला. पर्यवेक्षक एस.आर.ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन व्ही.बी.सोनवणे, व्ही.एच.सनेर यांनी केले होते. आभार व्ही.बी.सोनवणे मानले.

मोहाडी पिंपळादेवी विद्यालय- श्री.पिंपळादेवी विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग विद्याधामचे योगशिक्षक विजय जाधव, सुरेखा जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य आर.व्ही.पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विजय जाधव म्हणाले की, प्रत्येकाने रोज सकाळच्या वेळेत किमान अर्धा ते एक तास योगा करावा व आपल्या बरोबर इतरांना योगा करण्यास सांगावे. याप्रसंगी मुख्याध्यापक आर.व्ही.पाटील, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एस.बी.पाटील, पर्यवेक्षक के.आर.सावंत, प्रा.एस.डी.बाविस्कर, आर.बी.शिंदे, एस.एम.पाटील, व्ही.बी.कापडणीस सहभागी झाले होते. आभार प्रा.एस.डी.बाविस्कर यांनी केले.

कुरखळी जि.प.शाळा- शिरपूर तालुक्यातील कुरखळी जि. प. मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अरूण नागरगोज, मिनाक्षी मोहीते यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्याना योगाचे धडे दिले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगासने केलीत. ज्ञानेश माळी यांनी योगाचे महत्त्व, शारीरिक स्वच्छता, खेळ,व्यायाम आदिंबाबत माहिती दिली. योगा कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सरला धनगर, सदस्या कविता अलकरी, मनिषा मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगिता नेरकर यांनी परिश्रम घेतले.

सावळदे जि.प.शाळा- शिरपूर तालुक्यातील सावळदे जि. प. शाळेत योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील तसेच शिक्षकांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले.

प्रिंपी जि.प.शाळा- शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा प्रिंपी येथे योग दिनी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सुकदेव भोई, मुख्याध्यापक निर्वास पावरा यांनी योगासने केलीत.

जैतपूर जि. प. शाळा- येथे मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील व पूनम कारले यांनी विद्यार्थीसोबतच योगासने करीत त्यांच्यात योगाची प्रात्याशिक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले.

आढे जि. प. शाळा- जिल्हा परिषद मराठी शाळेत योगदिनी विद्यार्थ्यांना योगाची महत्व सांगितले तसेच योगाचे प्रात्यशिक करून दाखविली. मुख्याध्यापक जितेंद्र भदाने यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम प्रकार सांगितले.

गिधाडे जि. प. शाळा- येथे येथील मराठी शाळेत योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक जितेंद्र जोशी यांनी योग दिनाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले.

खर्दे-पाथर्डे जि.प. शाळा- मराठी शाळाखर्दे-पाथर्डे येथे सकाळी योग दिन घेण्यात आला. योगेश पाटील, निरज जोशी यांनी विद्यार्थीसोबत योगासने करून योगाचे महत्व सांगितले.

ताजपुरी जि.प. शाळा- मुख्याध्यापक सोळंकी, बाभूळदे शाळेचे मुख्याध्यापक पवार यांनीही योगाचे प्रात्यक्षिके करून योगदिन साजरा केला.

दोंडाईचा पालिकेतर्फे योग दिन-
येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सभापती सौ वैशाली प्रवीण महाजन यांच्या पुढाकारातून जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी योग प्रशिक्षक श्री वाडीले,पतंजली योग समितीचे राजेंद्र भावसार, रोहिणी लिभारे, उद्योगपती कैलास जैन, नगरसेवक भरतरी ठाकूर प्रदीप कागणे ,किसन दोधेजा, डाँ झोहरा शाह, जितेंद्र गिरासे उपस्थित होते.

दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद गुरुकुल-
स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थांनी योगा केला.
यावेळी प्राचार्या सुरेखा राजपूत यांनी जागतिक योग दिन व योगाची, प्राणायामाचे महत्व विद्यार्थांना सागितले. तसेच निरोगी आयुष्यासाठी योगाचे महत्व पटवुन दिले. संस्थेचे चेअरमन माजी आ. बापुसाहेब रावल, सचिव शिप्राताई रावल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. क्रिडा शिक्षक जयेश राजपूत, सचिन कुळकर्णी यांनी देखील योेगासनाचे महत्व आणि लाभ या विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

शिरपूरात योग दिन- शिरपूर येथील एस.पी.एम. महाविद्यालय, महात्मा ज्योतीबा विद्यालय, बापू पांडू माळी विद्यालय, पतंजली योगपिठ यांच्या संयुक्त विद्यमानाने दादासाहेब विश्वासराव रंधे, क्रीडा संकुलात योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तुषार रंधे, पोलिस उपविभागीय अधिकारी एल.एल.तडवी यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एन.पटेल, उपचार्य व्ही.एम. पाटील, डी.बी.पाटील, एल.के.प्रताळे, हेमंत शेटे, शैलेंद्र गिराशे, जितेंद्र शेटे, किशोर गुरव, भगवान ठाकूर, मनोज चव्हाण, सुनिल गुरव आदी. उपस्थित होते. यावेळी कर्नल अनिल जॉन यांनी मार्गदर्शन केले.
गोताणे राजीव गांधी विद्यालय- येथील राजीव गांधी विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी एस.एन.महाजन यांनी योगाचे प्रात्याक्षिकरण केले. यावेळी एस.व्ही.देसले, डी.ए.पाटील, बी.एम.पाटील आदी उपस्थित होते.

मोहाडी पिंपळादेवी विद्यालय- पिंपळादेवी विद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हींगचे मंजूषा लोहाणीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी योग शिक्षक गायत्री भावसार, सचिन लोंढे, हर्षल वाघ, अर्जुन वाघ, हेमंत मोरे, धर्मा सोहळे यांनी प्रत्याक्षिककरण केले. मुख्याध्यापक विजय ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार नंदराज सोनवणे यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

*