होमगार्ड सेवा समाप्तीचा निर्णय मागे घ्या!

0
पिंपळनेर । वार्ताहर-होमगार्ड पदावरुन सेवा समाप्तीचे अन्यायकारक आदेश रद्द होवून, पुन:श्च होमगार्ड पदावर पदस्थापना होण्याचे आदेश व्हावेत, यासाठी पिंपळनेर येथील 16 होमगार्डनी पिंपळनेर अपर तहसीलदार वाय.सी.सूर्यवंशी यांना निवेदन सादार केले.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर पोलिस ठाणे अंतर्गत होमगार्ड पदावर 22 वर्षापासून अत्यंत कमी मानधनावर, पिंपळनेर पोलिस ठाणे यांच्या आदेशान्वये, ईद, दिवाळी, गणपती, उत्सव, होळी, पोळा, यात्रोत्सव तसेच महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी व निवडणूक बंदोबस्त तसेच वेळोवेळी प्रासंगिक कामी समाजात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे काम करीत आलो.

इतर शासकीय खात्याचे रोजंदारी कर्मचार्‍यांना शासनाने सेवेत कायम अस्थापनेवर सामावून घेण्याच काम केले. त्याचप्रमाणे केलेल्या प्रदीर्घ सेवा इमाने, हतबारे केलेली आहे.

या सेवेबाबत विचार होवून पोलिस भरतीत सामावले जाईल. शासन सेवेत कायम केले जाईल या एकमेव आशेने नेमून दिलेली कामे करीत आहोत.

मात्र जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे होमगार्ड पदावरुन सेवा समाप्तीचे अत्यंत अन्यायकारक आदेश पारित करुन होमगार्ड पदावरुन कमी केलेले आहे.

त्यामुळे कुटुंबियांवर अन्याय करणारा आदेश आहे. या सेवेतील काही होमगार्ड यांना केवळ 7 वर्ष सेवा झाल्याचे असतांना त्यांना आकसबुध्दीने सेवा जेष्ठतेचा विचार न करता पदावरुन कमी करणे हा अन्यायच आहे.

सेवा समाप्तीचा अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द होवून पुन:श्च पदावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह धरणे आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर 16 होमगार्ड यांच्या सह्या केल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*