Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

धुळ्यात हेल्मेट सक्ती रद्द करुन वाहतूक व्यवस्था सुधारा!

Share
धुळे । शहरात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहातंर्गत हेलमेटचा वापर सक्तीचा केला असून त्यासंदर्भात दुचाकी वाहन धारकांकडून शहर वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारुन सक्तीची वसुली केली जात आहे. राज्यभरात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. या सप्ताहाची जनजागृती होण्या ऐवजी शहर वाहतुक शाखेने सुरक्षा सप्ताह औचीत्य साधून खंडणी वसूल करण्याचेच धोरण अवलंबले आहे.

महाराष्ट्रात महत्वाच्या मेट्रो शहरात सद्या हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्यात आहे. परंतू धुळे शहरात आजपर्यंत याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शहरातील दुचाकी वाहन चालकांना कुठलीही पुर्व सुचना न देता अचानकपणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई अत्यंत चूकीची असून हेल्मेटची सक्ती तातडीने रद्द करावी. धुळे शहर पोलीस वाहतूक शाखेने अगोदर अडचणीच्या ठिकाणचे अतिक्रमीत रस्ते मोकळे करावे, अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना महानगरतर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांना देण्यात आले. तसेच शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली.

शिवसेनेने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, धुळे शहरातील बाराफत्तर चौक, संतोषी माता चौक, फुलवाला चौक, जे.टी.कराची वाला खुंट, जुने तहसील ऑफीस, दत्तमंदीर चौक, झाशी राणी पुतळा, ग.नं.4, ग.नं.6, पाटबाजार आदींसह महत्वाच्या चौकांत नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या गजबजलेल्या चौकात झालेले अतिक्रमण त्यामुळे नेहमीच या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प होते. तोच प्रकार आग्रा रोड पाच कंदील या भागात देखिल होतो. त्यामुळे वाहन चालकांचे अपघात देखिल होतात.

रस्त्यावरती केलेल्या बेशिस्त पार्कींगमुळे रस्ता रुंद होतो. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविण्यास अडचण निर्माण होते. शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक वर्षापासून बंद असून ती कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेशीस्त पार्कींग, मोकळी केल्यानंतर वाहतुक शाखेने आपल्या नियमांची अंमलबजावणी करावी. हेलमेट सक्तीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असून त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, सस्था, शाळा महाविद्यालये, सरकारी कार्यालये यामध्ये जनजागृती अभियान राबविणे गरजेचे आहे. ते होतांना दिसत नाही.

हेलमेट सक्ती ही शहरात न होता राष्ट्रीय महामार्गांवर करण्यात यावी. शहरातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करुन रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरीत हटवावीत, अन्यथा शिवसेना हेलमेट सक्ती विरोधात जन आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदन देण्यात आला.यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतूल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख धिरज पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, माजी नगरसेवक गुलाब माळी, भरत मोरे, बबन थोरात, विनोद जगताप, कुणाल कानकाटे, राहुल दोडे, महादू गवळी आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!