वृक्ष लागवडीसाठी हरीत सेना पोर्टलवर नोंदणी करा !

0
धुळे । दि.20 । प्रतिनिधी-जिल्ह्यात 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक नोंदणी हरीत सेना पोर्टलवर (ग्रीन आर्मी) तत्काळ करावी. वृक्ष लागवड मोहिमेची परिपूर्ण तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपवनसरंक्षक जी. के. अनारसे, उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये, शुभांगी भारदे, सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, रेवती कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, वृक्षारोपणाची जय्यत तयारी पूर्णत्वास येत आहे. जिल्ह्यात 8.2 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. काही यंत्रणांनी अद्यापही अक्षांश, रेखांशबाबतची माहिती वनविभागाकडे सादर केलेली नाही.

त्यामुळे संबंधित विभागांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत आवश्यक माहितीची पूर्तता करावी. वातावरणात होणारे बदल, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यंत्रणानिहाय रोपांचे देण्यात आलेले उद्दिष्ट, उपलब्ध रोपे, रोपांच्या वाहतुकीचे नियोजन याविषयी सविस्तर आढावा घेतला.

उपवनसंरक्षक श्री. अनारसे यांनी वृक्षारोपण मोहिमेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, संगणक प्रणालीत रोपवनस्थळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

हरीत सेनेच्या नोंदणीसाठी प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

 

LEAVE A REPLY

*