विक्की चावरेला दौंड येथून अटक

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-कुख्यात गुंड शेख रफियोद्दीन शेख शफियोद्दीन उर्फ गुड्ड्या हत्याप्रकरणी संशयित आरोपी विक्की उर्फ विक्रम रमेश चावरे याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत सहा मारेकरी आणि आरोपींना आश्रय देणारे व मदत करणारे सहा जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत एकुण 12 जणांना यात पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य मुख्य संशयित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
शहरातील पारोळा रोडवरील गोपाल टी जवळ गुंड गुड्ड्याची दि.18 जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी घटना घडल्यानंतर लगेचच पसार झाले.

संशयितांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आवाहन आहे. परंतु पोलिस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिंमतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुड्ड्याच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून या पथकांनी दिवसरात्र एक करुन आतापर्यंत 12 संशयितांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

दरम्यान, आज सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.आर.राठोड यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलिसांच्या पथकाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने विक्की उर्फ विक्रम रमेश चावरे, रा.एकता नगर, बिलाडीरोड याला अटक करण्यात आली.

तो दौंड येथील एका साखर कारखान्यातील कामगाराच्या निवासस्थानी लपून बसला होता. सदर पथकात हेकाँ दीपक पाटील, अरुण चव्हाण, पोना कुणाल पानपाटील, रवींद्र राठोड, रमेश माळी, मनोज बागूल यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*