GST : जनसामान्यांचे हित, पारदर्शक अर्थव्यवस्थेला चालना

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-जीएसटीमुळे कोणालाही त्रास होणार नाही, त्यातून सर्वांचा फायदाच आहे. फक्त कामाच्या पध्दतीत बदल होणार असून त्यासाठी व्यापार्‍यांना आपली ‘बिझनेस स्टाईल’ बदलावी लागेल.
सरकारच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करुन व्यापार करावा लागेल. सर्वांचा हिताचा विचार करुनच सरकारने हा कायदा आणला असून यातून पारदर्शक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असा सूर नाशिक येथील सीए विशाल पोतदार व धुळे येथील सीए रचेंद्र मुंदडा या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला.
खान्देश चेंबर ऑफ कॉमर्स आणि धुळे व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटीवरील मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.

विशाल पोतदार म्हणाले की, पुर्वी आपल्यासाठी व्यापार म्हणजे एक छोटा तलाव होता. जीएसटीच्या रुपाने मोठा समुद्र उपलब्ध होत आहे.

यामुळे आपल्याला लाटांनाही सामोरे जावे लागेल. गोड पाण्यातून खार्‍या पाण्यात जावे तशी अवस्था राहील. मात्र डगमगण्याचे कारण नाही.

यातुन सर्व परिस्थिती सुरळीत होईल. यासाठी व्यापार्‍यांनी सॉफ्टवेअर आणि कन्सल्टंट या दोन गोष्टींना महत्व द्यावे, याची पुरेशी माहिती करुन घ्यावी.

टॅक्स, ग्राहकांना देण्यात येणारी सर्व्हीस, आपली बिझनेस स्टाईल असा सर्वच बदल होणार आहे. सरकारचे व्हीजन चांगले असल्याने आपणही सकारात्मक म्हणून त्याकडे पहावे.

अ‍ॅन्टी प्रॉपर्टी झाल्यास आपण शिक्षेला पात्र ठरु, त्यामुळे कठीण निर्णयासाठी सज्ज रहा आणि जीएसटीची चांगली अंमलबजावणी करा, असे आवाहन यावेळी तंज्ज्ञानी केले.

प्रास्ताविक अभय बंग यांनी तर सत्रसंचलन सुभाष कोटेचा यांनी केले. यावेळी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 

 

LEAVE A REPLY

*