Type to search

maharashtra धुळे

घोडसगाव येथे घरफोडी सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Share
धुळे । शिरपूर तालुक्यातील घोडसगाव येथे खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी एक लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, घोडसगाव, ता. शिरपूर येथे राहणारे बाळू भावलाल पाटील यांच्या राहत्या घराच्या स्वयंपाक खोलीचे खिडकीचे लोखंडी गज चोरट्यांनी दि. 22 एप्रिल रोजी रात्री 12.58 वाजता वाकवून घरात प्रवेश केला. घरातून 74 ग्रॅम सोन्याचे दागिने, 750 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल असा एक लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसाला दमदाटी- शिरपूर शहरातील आंबा गल्लीजवळ पाच कंदील चौकात राजेश सुरेश महाजन हा हातगाडीवर रामफळ विक्री करीत असतांना पोकॉ संजय दिवान भामरे यांनी हातगाडी रस्त्यावरुन बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग येवून महाजनने पोकॉ भामरे यांना दमदाटी करुन तू वर्दीत नसता तर येथेच मारले असते. असे सांगून शिवीगाळ केली व त्यांचा जोरात हात झटकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशी फिर्याद शिरपूर पोलिस ठाण्यात पोकॉ संजय भामरे यांनी दिली. भादंवि 353, 323, 504, 506सह मुंबई पोलिस अ‍ॅक्ट 102, 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकली चोरी- शहरातील कुमारनगर भागात नदी किनारी शाम सुंदरलाल रेलन या व्यापार्‍यांनी त्यांच्या मालकीची दहा हजार रुपये किंमतीची एमएच 18 एजी 1444 क्रमांकाची मोटारसायकल लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायक चोरुन नेली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रेलन यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

50 हजाराची सोनपोत लांबविली
धुळे शहरातील भगतसिंग नगरात राहणार्‍या सुलभा भरत कुलकर्णी या दि. 22 एप्रिल रोजी देवपूर भागातून जात असतांना मोटार सायकलीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोनपोत बळजबरीने हिसकावून घेतली व मोटार सायकलीवर पळून गेला. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात सुलभा कुलकर्णी यांनी फिर्याद दिली त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!