Type to search

maharashtra धुळे

धुळ्यात गॅसचा भडका, चौघे भाजले

Share
धुळे । शहरातील देवपूर भागातील एकवीरा देवी मंदिराजवळील गल्ली नंबर 7 मध्ये एका घरात अचानक गॅसचा भडका उडाला़ ही घटना मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात चार जण भाजले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळीतांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ग.नं.7 मध्ये राहणार्‍या निर्मलाबाई लालचंद भोई (वय-50) या आज (दि. 7) सकाळी 7 वाजता गॅसवर चहा करण्यासाठी गेल्या. मात्र, सिलिंडरमधून गॅस गळती सुरू होती. गॅस बाहेर पडतांना होणार्‍या आवाजाने घरातील सर्वजण घाबरले. निर्मलाबाई यांनी मदतीसाठी शेजारी राहणार्‍या सुधाकर ज्ञानेश्वर जोशी याला बोलविले. गळती सुरू असलेल्या गॅस सिलिंडरचा नॉक बंद करण्याच्या प्रयत्नात सुधाकर जोशी करत असतांनाच घरात मोठ्या प्रमाणात गॅस पसरला. घरात एक दिवा पेट असल्याने अचानक आग लागली. आगीच्या या भडक्यात निर्मलाबाई लालचंद भोई (वय-50), अक्षय लालचंद भोई (वय-28), दीपा लालचंद भोई (वय-33) आणि सुधाकर ज्ञानेश्वर जोशी (वय-40) हे चौघे जण भाजले. जखमींना तात्काळ खासगी वाहनाने सुदाम परशुराम भोई यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुधाकर जोशी हा 98 टक्के, निर्मला भोई या 74 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अक्षय भोई हा 18 टक्के तर दीपा भोई ही 9 टक्के भाजली असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू व अन्य साहित्य खाक झाले. घरात आग लागल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, घटनास्थळी बंब उशिरा आल्याने शेजार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अग्नीशामक बंब आल्यानंतर आग आटोक्यात आली. ग.नं.7 ही गजबजलेली गल्ली आहे. आग त्वरीत आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या स्फोटात सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुलगा व सुनेचा आक्रोश
घटना घडली तेव्हा निर्मलाबाई भोई यांचा मोठा मुलगा, सुन आणि नात हे लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. ते आज सकाळी या घटनेनंतर घरी परतले. घरातील दृष्य आणि भाजलेले आई, भाऊ, बहिण यांना पाहून एकच आक्रोश केला. यामुळे तेथे उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!