Type to search

Featured धुळे फिचर्स

धुळ्यात पाच लाखांचा गुटखा जप्त

Share

धुळे – 

शहरातील गल्ली क्र. 4 मधील गणराया ट्रान्सपोर्टमध्ये आझादनगर पोलिसांनी तब्बल 4 लाख 64 हजार 48 रूपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गल्ली क्र. 4 मधील गणराया (आर.के) ट्रान्सपोर्टमध्ये बेकायदेशीररित्या सुगंधी पान मसाला व तंबाखू तसेच विमल गुटख्याचा साठा छुप्या पध्दतीने उतरविला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगरचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पोना सुनिल पाथरवट, बापु कोकणी, विजय शिरसाठ, भुषण पाटील, शोएब शेख, आतीक शेख, मितेश शिंदे, खैरनार आदींच्या पथकाने दि. 13 रोजी तेथे छापा टाकला.

तेथून 12 मोठ्या गोण्यांमध्ये भरलेला प्रिमीयम राज निवास सुगंधित पान मसाला, प्रिमीयम एन.पी-01 जा फराणी जर्दा तंबाखू व प्रिमियम एन.पी-01 चुव्हींग टॅबको, केसर युक्त विमलपान मसाला, वि-1 तंबाखू असा एकुण 4 लाख 64 हजार 48 हजारांचा साठा जप्त केला.

तसेच बिलाल अहमद अनीस अहमद तांबोळी (रा. हजारखोली, कामगार नगर, धुळे) याला ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांच्या मदतीने आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!