Type to search

धुळे फिचर्स

नरडाण्यात आग : 14 लाखांचे नुकसान

Share

सोनगीर

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीतील फेज दोन बाभळे हद्दीत डॉ. एजाज शेख यांच्या मालकीच्या सेवा सर्जिकल कंपनीला आज दि.24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. यात सुमारे 14 लाखांंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाभळे येथील एमआयडीसी परिसरात प्लॉट नं.अ.57 मध्ये डॉ. एजाज शेख यांच्या मालकीची सेवा सर्जिकल कंपनी आहे. या कंपनीला 2 वाजेच्या सुमारास आग लागली. यानंतर बाभळेचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील व नागरिकांनी कंपनीकडे धाव घेतली व सरपंच पाटील यांनी माहिती अग्निशामक विभागाला दिली. या आगीत सर्जिकल मालाचे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

कंपनीला लागलेल्या आगीत सर्जिकलचा पक्का माल व इलेक्ट्रिक फिटिंग, वायर, जळून खाक झाले असून मशीनचे ही नुकसान झाले. यात 14 लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक मोटारच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती पुढे आली आहे.

दुपारी दिड ते अडीच वाजेच्या दरम्यान कर्मचारी जेवणाच्या सुटीत बाहेर असल्याने आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

अग्निशामक बंब उशिरा
बाभळेचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी या आगीची घटना धुळे महापालिकेच्या अग्नीशामक विभागाला कळविली. मात्र याठिकाणाहून दोन बंब चक्क दोन तासानंतर घटनास्थळी पोहचले. वास्तविक मुंबई-आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण असतांना आणि दुपारच्या वेळी जास्तीची रहदारी नसतांनाही एव्हढा उशिर का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!