पाच शेतकर्‍यांविरुद्ध गुन्हा

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधाननजीक टोल नाक्यापुढील रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण करणार्‍या पाच शेतकर्‍यांविरुध्द मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्याचे काम होवू देणार नाही. आम्हाला आमच्या गटाचे वाढीव मोबदल्याची रक्कम मिळवून द्या अशी भूमिका निमजी फकिरा बोरसेसह अन्य शेतकर्‍यांनी घेतली.

त्यावेळी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचे मॅनेजर संजय शिवाजीराव गुरव यांनी मोबदल्याचे पैसे न्यायालयात जमा आहेत असे सांगितले परंतू या पाचही शेतकर्‍यांनी रस्त्याचे काम होवू देणार नाही असे सांगून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच शिवीगाळ व दमदाटी केली अशी फिर्याद संजय गुरव यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिली.

भादंवि 353, 143, 147, 504, 506 प्रमाणे निमजी फकिरा बोरसे, गोकुळ उर्फ पिंटू निमजी बोरसे, तुकाराम निमजी बोरसे, संदीप निमजी बोरसे, आबा नारायण बोरसे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*