Type to search

Featured धुळे फिचर्स

धुळ्यात आयशर ट्रकवर आदळून 3 ठार

Share

धुळे – 

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रसराज समोर भरधाव आशयर वाहन ट्रक आदळून झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले. तर दोन्ही वाहनांसह त्यातील मालाचेही मोठे नुकसान झाले आहे.
टोमॅटो भरलेली आयशर (क्र. एम. एच. 18 ए. ए. 8384) सोनगीरकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जात असतांना शहरातील मुंबई – आग्रा महामार्गावरील हॉटेल रसराजजवळ पुढे चालणार्‍या ट्रकवर (क्र. एम. एच. 18 ए. ए. 2484) आदळली.

या भिषण अपघातात चालक बबलु उर्फ परेश रविंद्र जाधव (वय 25) रा. वल्ली विकवेल ता. शिंदखेडा, अशोक प्रभाकर जगताप (वय 25) रा. दंडेवाले बाबानगर मोहाडी धुळे व रंगराव भिमराव बाविस्कर (वय 25) रा. मीरसकर नगर, पवननगर चाळीसगांव रोड, धुळे हे तिघे ठार झाले.

हा अपघात काल दि. 12 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.

या अपघातात आयशर आणि ट्रकचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी पोकॉ. शशिकांत देवरे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी आयशर चालक मयत परेश जाधव याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोसई एल. एन. पवार हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!