Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशशाळेतील ध्वजारोहणादरम्यान दुर्दैवी अपघात; विजेचा धक्का लागून एका चिमुरड्याचा मृत्यू

शाळेतील ध्वजारोहणादरम्यान दुर्दैवी अपघात; विजेचा धक्का लागून एका चिमुरड्याचा मृत्यू

दिल्ली | Delhi

संपूर्ण देशात ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान बिहारमधील बक्सरमध्ये (Traumatic Accident In Buxar) ध्वजारोहण करताना मोठी दुर्घटना घडली आहे.

- Advertisement -

ध्वजारोहणाच्या पाईपमधून विजेच्या प्रवाह गेल्याने झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक मुले गंभीर जखमी झाली आहे. सध्या जखमींवर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बक्सरच्या नाथुपूर प्राथमिक शाळेत झेंडा फडकवताना शाळकरी मुलांना विजेचा धक्का लागल्याने एक मोठा अपघात झाला. यात एका मुलाचा मृत्यू झाला तर 4 मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्याच्यावर बक्सर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मुलांचे कुटुंबीय रडून आक्रोश करत आहेत. स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मुलांवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे की, पाईपमध्ये करंट कसा आला?

विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा फडकवण्यासाठी मुले शाळेत पोहोचली होती. ध्वजारोहणापूर्वी मुलांनी ध्वजाच्या पाईपला हात लावला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

- Advertisment -

ताज्या बातम्या