Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअँटीजेन टेस्टसाठी कॅन्टोन्मेंटकडून 3 दिवस मुदतवाढ

अँटीजेन टेस्टसाठी कॅन्टोन्मेंटकडून 3 दिवस मुदतवाढ

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील पेपर विक्रेत्यांसह दुकानदारांना कोरोनाची अँटीजेन चाचणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. अनेकांची टेस्ट अजूनही बाकी असल्याने पुन्हा ३ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे…

- Advertisement -

ब्रेक द चेन अंतर्गत नाशिक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या टीमने देवळालीत ३ दिवसात १२४४ लोकांची तपासणी केली आहे.

अनेकांची तपासणी अजूनही बाकी असल्याने बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याशी चर्चा करून ३ दिवस तपासणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

त्यानुसार १५ ते १७ जूनदरम्यान राहिलेल्या नागरिकांनी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री नटेश यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या