कलाशिक्षक संघाची उच्च न्यायालयात याचिका

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-कलाविषयाच्या तासिकांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेतील तासिका वाटप शासन परिपत्रक दि.27 एप्रिल नुसार पन्नास टक्के तासिका कपात झाल्याने व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाने शासनाकडे तब्बल दिड महिन्यांपासून सातत्याने विविध लेखी पाठपुरावे करून विविध आंदोलने करूनही आजपर्यंत शासनाने या कलाविषयाचे महत्व कमी करावे म्हणून शासन परिपत्रक मागे न घेतल्याने अखेर कलाशिक्षकांसाठी न्यायीक लढा देणारी व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाच्या वतीने संपूर्ण नाशिक विभागातील कलाशिक्षकांच्या हितार्थ उच्च खंडपिठ औरंगाबाद येथे शासनाविरुध्द रिट याचिका दाखल केली.

शासनाने कला, क्रीडा, संगित, कार्यानुभव तासिक या कलाशिक्षकांना वा त्यांच्या कोणत्याही संघटनांना, विद्यार्थी पालक यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला.

पुर्वी प्रत्येक वर्गास चार तासिका असतांना शासन परिपत्रक दि.28 एप्रिल रोजी काढून त्या परिपत्रकात कला विषयासाठी केवळ दोन तासिका फक्त ठेवण्यात आल्याने या धोरणाविरुध्द याचिका दाखल केली आहे.

 

LEAVE A REPLY

*