Type to search

धुळे

डॉ. हेमंत देशमुख यांच्या जामिन अर्जावर आज कामकाज

Share

दोंडाईचा | येथील घरकुल गैरव्यवहार आणि व्दारकाधिश उपसा योजनेत ५६ लाखाच्या गैरव्यवहार प्रकरणात कारागृहात असलेले माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्या जामिन अर्जावर उद्या दि. १९ रोजी कामकाज होणार आहे. दरम्यान, व्दारकाधिश उपसा योजनेचे तक्रारदार विक्रम हिरामण तायडे यांनी डॉ.हेमंत देशमुख व उपसा योजनेचे सचिव रामसिंग गिरासे यांच्या पासुन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या जीवास धोका असल्याचा अर्ज त्यांनी दोंडाईचा पोलिसात दिला आहे.

व्दारकाधिश उपसा योजनेत ५६ लाखाच्या अपहार प्रकरणी दोंडाईचा पोलिसात दि. २५ ऑगष्ट रोजी एसीबीचे पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तत्पूर्वी डॉ. हेमंत देशमुख यांना घरकुल गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती, म्हणून त्यांना दोन्ही गुन्हयातून जामिन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला.

व्दारकाधिश उपसा योजनेच्या प्रकरणात उद्या दि. १९ ऑगष्ट रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधिश मंगला धोटे यांच्याकडे कामकाज होणार असून घरकुल गैरव्यवहार प्रकरणात दि. २० रोजी न्या.उगले यांच्याकडे जामीन अर्जावर कामकाज होणार आहे. दरम्यान, कारागृहात असलेले डॉ.हेमंत देशमुख यांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले असून दि. १४ पासून ते रूग्णालयातच उपचार घेत आहेत.

दुसरीकडे विखरण येथील शेतकरी विक्रम हिरामण तायडे यांनी व्दारकाधिश उपसा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी शासनाकडे तक्रार दाखल केली होती, त्यानुसार एसीबीकडून चौकशी होवून त्यात ५६ लाखाचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे योजनेचे चेअरमन माजमंत्री डॉ.हेमंत देशमुख व योजनेचे सचिव रामसिंग गिरासे यांच्या पासून स्वत:ला व माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका असल्याचा अर्ज तक्रारदार विक्रम हिरामण तायडे यांनी दि. १६ ऑगष्ट रोजी दोंडाईचा पोलिस स्टेशनसह एसीबीच्या कार्यालयाला दिला असून त्यांनी सरंक्षण मिळण्याची मागणी अर्जातून केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!