भीमस्मृती यात्रेला उसळला भिमसागर

0
लळींग । दि.31 । वार्ताहर-ऐतिहासिक किल्ले लळींग कुरणातील लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रा मोठ्या उत्साहात झाली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील ऐतिहासिक वास्तव्यानंतर त्यांच्या पावन स्मृती जपण्यासाठी दरवर्षी याठिकाणी आंबेडकरी जनता हजारोंच्या संख्येने दाखल होते.
सालाबादाप्रमाणे यंदा देखील राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

माजी आ. प्रा. शरद पाटील यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भीमस्मृती यात्रेत सहभागी झाले होते. भीमस्मृती यात्रेनिमित्त याठिकाणी अनेक सामाजिक संघटनांकडून विविध उपक्रम राबविण्यात आले होते.

भीम गीतांच्या सुरेल सांस्कृतिक कार्यक्रमातून जनप्रबोधन करण्यात आले. यात प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी, दक्ष पत्रकार संघ, समता परिषद यासारख्या अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग होता.

यंदा मोठ्या वाहनांसह खाद्य पदार्थांच्या दुकानांना लांडोर बंगला परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याला प्रतिसाद देत जवळपास सर्वच मोठी वाहनं ही महामार्गालगत पार्किंग करण्यात आले होते.

त्याचबरोबर खाद्य पदार्थांची दुकानं देखील महामार्गाच्या कडेला थाटण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी लांडोर बंगला परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणासह होत असे.

मात्र, यंदा प्रथमच वनविभागाला पोलीस प्रशासनाच्या मदतीने यावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 

LEAVE A REPLY

*