Type to search

धुळे

सोनवद धरण पूर्ण क्षमतेने भरा!

Share

डोंगरगाव | शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगावजवळील सोनवद धरणात २० टक्केच पाणीसाठा आहे. हे धरण भरण्यासाठी २१२.४० दलघमी एवढ्या क्षमतेचे पाणी आवश्यक आहे. त्यामुळे धरण त्वरित भरण्यात यावे. धरण पुर्ण क्षमतेने न भरल्यास उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी दिला आहे.

या धरणावर २१४७ हेक्टर शेतजमिनीचे सिंचन असून कापडणे, धनूर पाणीपुरवठा योजना, सोनगीरसह १८ गावे पाणीपुरवठा योजना, मांडळ, कंचनपूर, वाघाडी, डोंगरगाव इत्यादी गावांचा पाणीपुरवठा येथूनच होतो. परंतु काल न्याहळोद ग्रामस्थांनी पांझरेच्या सोनवद कॅनॉलद्वारे २० टक्के पाणी द्या अशी मागणी केली आहे. तसेच २० टक्के त्यांचे पाण्याचे आरक्षण असून सोनवद धरण जर शंभर टक्के भरले तर उर्वरीत ठिकाणी २० टक्के पाणी द्या असे आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर कॅनॉलचे संपुर्ण पाणी घेतले तरी हरकत नाही. परंतु सध्या सोनवद धरणात आतापर्यंत फक्त १५ ते २० टक्केच पाणीसाठा झाला आहे. आणि न्याहळोद येथील ग्रामस्थ या कॅनॉलमधून पाणी द्या अशी मागणी करीत आहेत. या मागणीला विरोध असून जर शासनाने सोनवद धरण भरले नसतांना या सोनवद कॅनॉलमधून इतरत्र पाणी दिले तर धुळे व नंदुरबार जिल्हा डीडीसी बँकचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह डोंगरगाव, कंचनपूर, वालखेडा, वाघाडी, वाघोदे, माळीच, कलमाडी, मांडळ, अजंदे इ. गावातील शेतकर्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!