दोंडाईच्यात नयनवृक्ष वनराई सप्ताहाला प्रारंभ

0
दोंडाईचा । दि.1 । प्रतिनिधी-येथील नगरपालिकेतर्फे नयनवृक्ष वनराई सप्ताहाचा शुभारंभ ब्रम्हकुमारीज मार्ग येथे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याहस्ते वृक्ष लागवडीने करण्यात आला.
अध्यक्षस्थानी उद्योगपती सरकारसाहेब रावल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल, उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे, तहसिलदार रोहिदास वारूडे, मुख्याधिकारी अजित निकत, पाणीपुरवठा सभापती करणसिंह देशमुख, बांधकाम सभापती संजय मराठे, आरोग्य सभापती वैशाली महाजन, नगरसेवक रवि उपाध्ये, किसन दोधेजा, निखील राजपूत, चिरंजीवी चौधरी, रमेश पारख, माजी विरोधी पक्षनेता प्रविण महाजन, नरेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, डी.आर.पाटील, किशोर जैन, डॉ.मुकुंद सोहोनी, राजेश मुनोत, नामदेव थोरात योजना राजपूत, रितेश कवाड, चंद्रकला सिसोदिया, विरेंद्र गिरासे, ललितसिंह गिरासे यांच्यासहविविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्याची गरज आहे.
वृक्षलागवड संकल्पना यापुढे कायमस्वरूपी ठेवावी, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी यावेळी केले.

उद्योगपती सरकारसाहेब रावल म्हणाले की, वडाचे झाड सर्वात जास्त ऑक्सीजन देत असते, त्यासाठी मी महामार्ग होत असतांना मोठ मोठी वडांची झाडे ट्रकमधुन आणून त्याचे पुनर्जिवन केले आहे, अशी 21 मोठी वडाची झाडे आम्ही जगविली आहेत.

नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल म्हणाल्या की, नगपालिकेच्या वतीने हिरवेगार दोंडाईचा करण्याचा संकल्प केला आहे.

त्यासाठी पालिकेकडून बक्षीसे देखील देण्यात येणार आहेत. बेस्ट ग्रीन क्लबला तीन प्रकारची बक्षीसे देण्यात येणार आहेत.

त्यात पहिले बक्षीस 5100 रूपये आणि प्रमाणपत्र, दुसरे बक्षीस 4100 रूपये आणि प्रमाणपत्र तर तृतीय बक्षीस 3100 रूपये आणि प्रमाणपत्र सरकारसाहेब रावल यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

यावेळी उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी आपल्या दादासाहेब रावल उद्योग समुहात 3000 व कृषी महाविद्यालयात देखील 3000 हजार झाडे लावण्याचा संकल्प केला.

दररोज वृक्ष लागवड करण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी 8 हजार झाडे लावण्यात आली असून यामध्ये काही रोपांना जाळी देखील बसविण्यात येणार आहे.

यासाठी पालिकेच्या प्रत्येक कर्मचार्‍यांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली असल्याची माहिती वृक्ष लागवड कार्यक्रमाचे मुख्य समन्यवक नगरसेवक रमेश पारख यांनी यावेळी दिली.

 

LEAVE A REPLY

*