Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या

दोंडाईचात कोल्ड स्टोरेजला भीषण आग

Share

धुळे : दोंडाईचा- मांडळ रस्त्यावरील  के.एस. कोल्ड स्टोरेज भीषण आग लागल्याची घटना आज रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशामक दल व दोंडाईचा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

दोंडाईचा-मांडळ रस्त्यावरील रावळ नगरात के.एस नावाचे कोल्ड स्टोरेज आहे. येथे सर्व प्रकारचा शेती माल खराब होवून नये म्हणून ठेवला जातो. आज दि. २ रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास या कोल्ड स्टोरेजला अचानक आग लागली.

काही वेळातच आगीने मोठा भडका घेतला. लांब अंतरापर्यंत आगीच्या ज्याला दिसून येत होत्या. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तसेच दोंडाईचा, शिंदखेडा येथून अग्नीशमन बंब पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याची काम सुरू होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजु शकलेले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!