Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या राजकीय

दोंडाईचा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सभा

Share

दोंडाईचा | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ५ वर्षात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी संपूर्ण राज्यभर महाजनादेश यात्रा काढून लोकांपर्यंत पोहचत असून या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने उद्या दि.२२ रोजी दोंडाईचा येथील दादासाहेब रावल क्रीडा संकुलात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, खा.डॉ.सुभाष भामरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी दोंडाईचा नगरी सजविण्यात आली असून ठिकठिकाणी पोस्टर्स बॅनरद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदखेड्यात विकासासाठी प्रचंड निधी दिलेला असून त्यांची जलयुक्त शिवार योजना शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड यशस्वी झाली आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे सर्वच शिवार जलयुक्त झाले असून शेतकरी समाधानी आहेत. याशिवाय सुलवाडे जामफळ उपसा योजना, प्रकाशा बुराई उपसा योजनेचे सुरू असलेले काम, तापी काठावरील २२ उपसा योजनांना दिलेला निधी, दोंडाईचा आणि शिंदखेडा शहराच्या विकासासाठी दिलेला कोट्यवधीच्या निधीतून शहरे सजू लागली असून बुराई नदीवर माथा ते पायथा बंधारे बांधण्यासाठी दिलेला निधी सत्कारणी लागला आहे. या सर्व कामांसह राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मिळविलेली उपलब्धी जनतेपुढे मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे.

या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सभापती नारायण पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष नथा पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!