कृषी दिनानिमित्त कृषीदूतांकडून मार्गदर्शन

0
तर्‍हाडी/दोंडाईचा । दि.2 । वार्ताहर/प्रतिनिधी-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुली अंतर्गत के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी विकास कार्यक्रम अंतर्गत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषीदिनाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच कैलास भामरे, कृषीभूषण शेतकरी सुदाम करंके, ओंकार पाटील, हिलाल भामरे, प्रतापसिंग गिरासे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते त्या शेतकर्‍यांचे शेताचे माती परिक्षण नमुन्याचे अहवाल वाटप करण्यात आले. कृषीदूत राहूल इसरवाडे यांनी शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती व शेतीत आधुनिकेतेचा अवलंब करावा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हा कृषी संदेश त्यांनी दिला.

त्यावेळी गावाचे शेतकरी व कृषीदूत नितेश गावीत, वैभव कापडणीस, योगेश्वर कदम, राहूल इसरवाडे, भरत महाजन, अरविंद बिराटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश्वर कदम यांनी केले.

खामखेडा येथे वृक्षारोपण
के.बी.पटेल कृषी महाविद्यालय शहादा ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी खामखेडा येथे कृषीदूत शेतकर्‍यांना मार्गदर्शनासाठी उपस्थित झाले.

यावेळी खामखेडा येथील शेतकर्‍यांना पिकांची माहिती दिली. माती परिक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा. यांचे प्रात्यक्षिक दाखविले व प्रश्नांचे निरीक्षण केले.

त्यावेळी विजय पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, किरण पाटील, भूषण पाटील, भगवान वाडीले, शेतकरी उपस्थित होते.

कृषीदूत शुभम पाटील, सदाराव भागर, भूषण राठोड, दीपक नेहते, शुभम पाटील सागर पाटील यांनी कार्यक्रम घडवून आणला.

दोंडाईचा- कृषी दिवसाचे अवचित्त साधुन देऊर बुद्रक येथे जि.प. केंद्र शाळा, कॅप्टन विश्वासराव देवरे विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त कार्यक्रम आयोजित करून विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील कृषिदूत प्रेमजीत गिरासे, चेतन पाटील, लखेसिंग गिरासे, अमोल पाटील, तुषार शिंगाडे, तेजस बागल, दीपक गिरासे, स्वप्नील राजपूत आदींनी पार पाडला.

या कार्यक्रमासाठी श्री.खैरनार, जे.पी.देवरे, सौ.स्वरूपा देवरे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता लखेसिंग गिरासे याने केली.

 

LEAVE A REPLY

*