अर्थसहाय्य योजनेंतर्गत 31 लाभार्थ्यांना मदत

0
दोंडाईचा । दि.31 । प्रतिनिधी-शिंदखेडा मतदारसंघातील विविध कारणांनी मृत्यू झालेल्याच्या वारसाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत 31 जणांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे एकूण सहा लाख 20 हजार रुपयाची आर्थिक मदत रोहयो व पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी मिळवून दिली आहे.

या मदतीचे वाटपचे धनादेश त्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिंदखेडा तहसीलदार रोहीदास वारुळे, जि.प.सदस्य कामराज निकम, माजी नगराध्यक्ष नाना मराठे, मडळाध्ीकारी शासऋी, कृष्णा नगराळे आदी उपस्थित होते.

या योजनेतून मंजूर झालेल्यात आशाबाई कुमावत (हातनुर), आशाबाई गिरासे(भडने), जयवंताबाई ठाकरे (विरदेल), राजकोरबाई बागूल (डाबली), कल्पना मोरे (दत्ताणे), सुनंदा सिसोदे (नरडाणा), सरस्वती भिल (बेटावद), सुनीता माळी (बेटावद), विजयाबाई गिरासे(टाकरखेडा), संगीता साळवे(मालपुर), वैशाली माळी(वारुड), अलका तिरमले(कुरकवाडे), चंद्रकला भिल(धमाणे), सायजाबाई भिल(वाघाडी), संगिता सूर्यवंशी(वरझडी), सुशिलाबाई मालचे(दरखेडा), सुनीता पारधी(शिंदखेडा), मंगलबाई भिल(वर्षी), विमलाबाई वडार(विरदेल), सुनंदा गुरव(चिलाणे), अनुबाई भिल(नेवाडे), आशाबाई तिरमले(विखुर्ले), भारती ईशी(खलाणे), शोभाबाई आगळे(मेथी), सरूबाई भिल(खलाणे),वंदना बडगुजर(शिंदखेडा), रुपाबाई भिल(कमखेडा) आदींना प्रत्येकी 20 हजार रुपयाचे धनादेश चे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

*