राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्या !

0
दोंडाईचा । प्रतिनिधी-सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत बीपीएल धारक जेष्ठ नागरिकांना विनामुल्य शारीरिक सहाय्यक यंत्र आणि जीवनावश्यक सहाय्यक उपकरणे वाटप करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्यामार्फत तालुकानिहाय दि.12 जुलै ते 17 जुलै 2017 या कालावधीत सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या ठिकाणी जेष्ठ नागरीकांना व्हीलचेअर, कुबड्या,वाकिंग स्टीक, वॉकर, ट्राईकोड, टेट्राकोड, चष्मे,नकली जबडा डीजीटल टाईप कान मशिनचे वाटप करण्यात येणार आहे.

शिबीरात उपस्थित राहून साहित्याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. यासाठी ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे. बीपीएल कार्डधारक आहेत.

त्यांनी तपासणी शिबिरातआपली नोंदणी करावी. तपासणी शिबिर संपन्न झाल्यानंतर उपकरण वाटपाची तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

सर्व ज्येष्ठ नागरीक जे भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना या भारत सरकारच्या योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छितात त्यांनी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्ससह निश्चित केलेल्या तपासणी दिनांकास उपस्थित राहण्याचे आवाहन ना.जयकुमार रावल यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*