हस्ती प्रि-प्रायमरी गृपचा अनोखा चिखलदिन

0
दोंडाईचा । दि.1 । वि.प्र.-हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती प्रि-प्रायमरी गृपतर्फे व अर्ली चाईल्डहूड असोसिएशनच्या मार्गदर्शनाने 1 जुलै हा दिवस हस्ती स्पोर्टस मैदान दोंडाईचा येथे ‘जागतिक चिखल दिन’ साजरा करून अनोखा उपक्रम राबविला.
या उपक्रमाचे विशेष म्हणजे चेअरमन कैलास जैन यांनी स्वत: विद्यार्थ्यांसमवेत चिखल दिनाचा आनंद लुटला.
या उपक्रमात हस्ती प्रि-प्रायमरी स्कूल, हस्ती किंडरगार्टन व हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश विभागातील नर्सरी, ज्यु.के.जी. व सि.के.जी. वर्गाचे चिमुरडे सहभागी झाले होते.

या दिवशी हस्ती स्पोर्टस मैदानावर तयार करण्यात आलेल्या चिखलात चिमुरडयांनी संगीताच्या तालावर नाचत, खेळत ऐकमेकांच्या अंगावर चिखल उडवित, चिखलात लोळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी पॉटर व्हीलवर मातीकामाचे प्रात्यक्षिकही कलाशिक्षकांनी बालकांना दाखविले.सोबतच चिमुरड्यांनी ग्लासमध्ये ओल्या मातीचा गोळा भरुन त्यांचे आकार, विटांचे आकारही तयार केले. यानंतर चिखलात बसून पासिंग बॉल व रस्सीखेच खेळ खेळण्यासोबत पांढर्‍या कपड्यांवर मुलांनी आपल्या हाताचे ठसेही उमटविले.

विशेषत: या चिखल दिन साजरा करताना महिला व पुरुष पालक, शालेय समिती चेअरमन कैलास जैन, शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदही सहभागी झाले होते.

यांनीही चिखलात कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल व रस्सीखेच असे विविध खेळ खेळण्याचा आनंद लुटला. चिखलात खेळल्यामुळे मुलांच्या ज्ञानेंद्रीयांना उत्तेजन मिळते, डोळे व हात यांच्यात समन्वय साधला जातो, स्थूल स्नायुंच्या कौशल्यात वाढ होते, कल्पनाशक्ती आणि सृजनशिलतेचा विकास होतो, निसर्गाशी थेट संबंध येतो तसेच मन आंनदी व शरीर बळकट बनते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हस्ती प्रि-प्रायमरी मुख्याध्यापिका रेखा गाडेकर, हस्ती किंडरगार्टन मुख्याध्यापिका-सकिना भारमल, हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश-समन्वयिका-स्मिा साठे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*