दोंडाईचा येथे सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त

0
धुळे । दि.28 । प्रतिनिधी-दोंडाईचा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका अट्टल चोराच्या घरावर छापा टाकून त्याने चोरलेला सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, आरोपी झाला.
दोंडाईचा शहरातील राणीपूरा भिलाटी येथे राहणारा अज्ज्या सलीम खाटीक हा अट्टल चोर असून त्याने चोरीचा माल त्याचे घर आणि परिसरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरुन त्याच्या घराव पोलिसांनी छापा टाकला.
मात्र, तत्पुर्वीच चोरटा फरार झाला होता. त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या शौचालयाची टाकी आणि खड्ड्यात त्याने चोरीचा माल लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिलसांना विनानंबरची मोटारसायकल, कॉन्टीनेंटल कंपनीचे दोन टायर, इलेक्ट्रॉनिक्स स्विच बोर्ड, 16 ताडपत्री असा तीन लाख 25 हजाराचा माल सापडला.

पोलिसांनी हा माल जप्त केला आहे. अज्ज्या खाटीकविरुध्द 379 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेकाँ वाडीले करीत आहेत.

गळफास घेवून दोघांची आत्महत्या – साक्री तालुक्यातील दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटनांची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे.

शेवाळी, ता.साक्री येथे राहणार्‍या सुधाकर लोटन साळुंके (वय 41) याने खरळबारी शिवारातील बंद हॉटेलच्या बाजूला लोखंडी अँगलला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली.

दि.27 जून रोजी त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. दुसर्‍या घटनेत पिंपळनेर येथे राहणार्‍या आम्रपाली चंद्रकांत नंदन (वय 24) या तरुणीने तिच्या राहत्या घरी छताला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची खबर तिचा चुलतभाऊ ज्ञानेश्वर नंदन याने पिंपळनेर पोलिसात दिली.

 

LEAVE A REPLY

*