Type to search

maharashtra धुळे

जिल्ह्यात प्रजासत्ताकदिनापासून स्वच्छतेचा जागर

Share
धुळे । स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि महाराष्ट्र राज्य वारकरी परिषदेच्या संयुक्त विदयमाने स्वच्छतेच्या जाणिव जागृतीसाठी जिल्हयात दि.26 जानेवारीपासून स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. दि.10 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार्‍या या जागरात जिल्हयातील प्रवचनकार 672 महसुली गावांमध्ये प्रवचन करणार आहेत.

संपूर्ण राज्यात महाराष्ट्राच्या स्वच्छतेचा जागर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी वारकरी साहित्य परिषदेचे प्रमुख पदाधिकारी जिल्हयाचा दौरा करीत असून त्यातंर्गत आज दि.15 रोजी कै.यशवंतराव चव्हाण सभागृह, जि.प. धुळे येथे पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी होते. व्यासपीठावर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, शिंदखेडयाचे गटविकास अधिकारी श्री. सुरेश शिवदे, ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प नरहरी महाराज चोैधरी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हयातील सुमारे 40 प्रवचनकार यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर बैठकीत प्रवचनकार महाराज यांच्या प्रबोधनासाठी शाश्वत स्वच्छता, वैयक्तीक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरुती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ग्रामीण कुटूंबांना शौचालय नियमित वापराची सवय, प्लॅस्टीक बंदी आणि प्लॅस्टीक चे धोक व परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयावर प्रबोधन होण्यासाठी संबधित विषयांचे टिपण उपलब्ध करुन देण्यात आले. या विषयांचा समावेश प्रवचनकार महाराज आपल्या प्रवचनात करणार आहेत. अभियान कालावधीत प्रवचन करणार्‍या प्रवचनकारांना मानधन दिले जाणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वाघ यांनी प्रास्ताविकातून अभियानाची माहिती दिली. पाणी गुणवत्ता तज्ज्ञ विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले.

पसायदानाने बैठकीची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा कक्षाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी व्ही. एस. पाटील यांच्यासह लेखाधिकारी श्रीमती संध्या शिलवंत, हेमंत लिंगायत, ई. टी. चौधरी, दीपक पाटील, संतोष नेरकर, प्रशांत देव, मनोज जगताप, अरुण महाजन, दिपक देसले, वैभव सयाजी, जीवन शिंदे, एम.जी. गढरी आदी कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!