धुळे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्लाच- वामसी चांदरेड्डी

0
धुळे । धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून धुळे तालुक्यात आ.कुणाल पाटील यांना गेल्या विधानसभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्क्य मिळाले आहे. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणूकीतही काँग्रेस पक्षाच्या उमदेवारास सवार्ंधिक मते देवून विजयी करावे.

देशात आणि राज्यातील भाजपा सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनेतेची फसवणूक केली आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी वामसी चांदरेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.9 जानेवारी रोजी धुळे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा आणि आढावा बैठकीचे धुळे येथे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे अध्यक्षस्थानी माजीमंत्री रोहिदास पाटील हे होते. यावेळी बुथ कमिटी, शक्ती अ‍ॅप नोंदणी, आणि जनसंपर्क अभियान या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे सहप्रभारी वामसी चांदरेड्डी यांनी सांगितले की, धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून धुळे तालुक्यात आ.कुणाल पाटील यांना गेल्या विधानसभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्क्य मिळाले आहे. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणूकीतही काँग्रेस पक्षाच्या उमदेवारास सवार्ंधिक मते देवून विजयी करावे. भाजपाने जनेतेची फसवणूक केली आहे. निवडणूक आयोगावर दबाव आणणे, सत्ता संपत्तीच्या जोरावर इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करून भाजपा सत्तेवर आली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याने जागृतपणे काम करणे गरजेचे आहे.जनसंपर्क अभियानातून काँग्रेस पक्षाला गावपातळीवर घराघरात पोहचवा. कारण देशातील मोदी सरकारचा खरा चेहरा उघडा पडला आहे.

शेतीमालाला जास्तीचा भाव देणे, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणे, दरवर्षी 2 कोटी तरुणांना नोकर्‍या देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र मोदींनी जनेतेला धोका दिला आहे. त्यामुळे देशातील जनता भाजपा सरकारची हकालपट्टी करण्यासाठी सज्ज झाले असून आता फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहचायचे आहे. शक्ती अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना आणि तळागाळतील काँग्रेस कार्यकर्त्याला आपले मत राहूल गांधीपर्यंत पोहचविण्याची संधी मिळणार आहे.आपल्या पसंतीचा उमेदवार, पदाधिकारी आपल्याला यातून निवडता येणार आहे.त्यामुळे आता शक्ती अ‍ॅपमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन सहप्रभारी वामसी चांदरेड्डी यांनी केले.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या इतका सक्षम उमेदवार दुसरा कोणीही नाही. स्व.चुडामण अण्णा यांनी तीन वेळा या मतदार संघात विजय मिळविला, एकदा तर त्यांना पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यापेक्षा मतधिक्य जास्त होते.अशा नेत्याचा वारसा लाभलेले रोहिदास पाटील हे सहा वेळा विधासभा आणि एक वेळा विधान परिषद सदस्य होते पाच वेळा त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन अनेक महत्वाची खाती सांभाळली. पक्षाने दोन वेळा त्यांना धुळे लोकसभा मतदार संघात डावलले हे या मतदार संघातील जनतेला रुचले नाही परिणामी दोन्ही वेळा भाजपाचा उमदेवार विजयी झाला. तीच चुक पुन्हा होऊ नये असे जि.प.चे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे यांनी सांगितले.

माजीमंत्री रोहिदास पाटील म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्याने गावपातळीपर्यंत काँग्रेस पक्षाला पोचहवून पुढे नेण्याचे काम करावे, पक्षात एकनिष्ठ कार्यकर्त्याला निश्चित न्याय मिळतो अशा प्रत्येक कार्यकर्त्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी संधी देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे देशात काँग्रसचीच सत्ता येईल असा विश्वास माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीला माजीमंत्री शोभा बच्छाव,

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभापती मधुकर गर्दे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, हर्षवर्धन दहिते, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान पाटील, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, कृऊबाचे उपसभापती रितेश पाटील, पं.स.चे उपसभापती दिनेश भदाणे, माजी जि.प.सभापती शांताराम राजपूत, कृऊबा सचांलक राजेंद्र भदाणे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राजीव पाटील, हर्षल साळुंके, तालुकाध्यक्ष पंकज चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन उपाध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी यांनी केले.

LEAVE A REPLY

*