जिल्हा बँकेच्या पिक कर्ज धोरणात आमुलाग्र बदल

बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांची माहिती

0
धुळे । धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2019-2020 या वर्षासाठी पिक कर्ज धोरणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली आहे.

संपुर्ण जिरायत पिके घेणार्‍या सभासदास एक लाख रुपये या मागील वर्षाच्या मर्यादेत 50 हजाराची वाढ करुन कमाल रक्कम एक लाख 50 हजार करण्यात आली आहे. तर बारमाही पिके घेणार्‍या सभासदास एक लाख 50 हजार रुपये या मागील वर्षाच्या मर्यादेत 50 हजाराची वाढ करुन कमाल रक्क

म दोन लाख रुपये करण्यात आली आहे. तर जिरायत बागायत व ऊस पिक घेणार्‍या सभासदास दोन लाख या मागील वर्षाच्या मर्यादेत 50 हजाराची वाढ करुन कमाल दोन लाख 50 हजार करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा बँकेने मागील वर्षाच्या पिक कर्ज धोरणात 15 ते 20 टक्के वाढ केली आहे. तसेच मागील वर्षी सभासदांना वाटप केलेल्या पिक कर्ज दरात 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. दि. 11 मार्च 2019 च्या संचालक मंडळ सभेमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार चालू वर्षाची धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती पाहता शेतकर्‍यांना वेळीच कर्ज पुरवठा होण्यासाठी बँक पिक कर्ज धोरणातील संस्था कर्ज वसुलीची 20 टक्के व 40 टक्के थकीत व्याज वसुलीची तसेच अनिष्ठ तफावतमध्ये असलेल्या संस्थांना कर्ज वाटप होण्यासाठी अटी शिथील करण्यात आली आहेत. त्याचा लाभ सर्व संस्थांमार्फत पिक कर्ज वाटप करण्यासाठी होणार आहे असे कदमबांडे यांनी सांगितले.

कर्जपुरवठा करण्यात येईल!
ज्या संस्थांचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73-क,अ नुसार दि.31 मार्च 2019 अखेर आपल्याकडील पिक कर्जाची परतफेड न केलेल्या संचालकांचा अपात्रतेचा प्रस्ताव संबंधित उप, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केल्यास अशा संस्थांना नियमित कर्जपुरवठा करण्यात येईल.
– धिरज चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी

सभासदांनी लाभ घ्यावा!
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना पिक कर्जाचा वेळीच व अवश्यक कर्ज पुरवठा रुपे किसान क्रेडीट कार्डद्वारे होण्यासाठी बँकेच्या मागील पिक कर्ज धोरणात बदल केलेला आहे.
– राजवर्धन कदमबांडे,
जिल्हा बँकेचे अध्यक्ष

LEAVE A REPLY

*