मनपाच्या महासभेत अंदाजपत्रकावर तीन तास चर्चा !

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-महापालिकेचे 2016-17 चे सुधारीत व 2017-18 अंदाजपत्रकास मंजूरी देण्यासाठी घेण्यात आलेली बैठक सुमारे तीन तास चालली. चर्चेअंती अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली.
महापालिकेची विशेष सभा महापौर कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली.

अनावश्यक तरतूदी- यापुर्वी स्थायी सभेत अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढले तर शहराचा विकास होवू शकतो.

परंतू सदर अंदाजपत्रक शहराच्या विकासासाठी नव्हे तर विभागप्रमुखांनी त्यांच्या सोयीसाठी तयार केले आहे. सदर अंदाजपत्रक शहराच्या विकासासाठी नाही तर मंजूर का करायचा? असा प्रश्न संजय गुजराथी यांनी उपस्थित केला.

या अंदाजपत्रकात शहराच्या विकासाची कुठलीही बाजू नाही. शहराचा विकास झाला पाहिजे पण दिशाभूल करण्यात आली आहे.

या अंदाजपत्रकात देण्यात आलेली मलेरिया विभागाचे तरतूद रद्द करावी. स्थायीत सुधारीत तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार आवश्यक तरतुदी रद्द करुन अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात यावी असे गुजराथी यांनी सांगितले.

 

मागच्या पानावरुन पुढे- मागच्या पानावर पुढच्या पानावर दरवर्षी अंदाजपत्रकाबाबत पाहिले जाते. सदस्यांना न समजता प्रशासन अंदाजपत्रक तयार करते.

अनेक त्रृट्या अंदाजपत्रकात आहेत. आयुक्त व अधिकार्‍यांना इंट्रेस्ट असलेल्या तरतूदी घेण्यात आल्या आहेत. ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन करीत आहेत.

आकडेमोड न करता अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. असा आरोप नरेंद्र परदेशी यांनी केला. अंदाजपत्रकानुसार किती नगरसेवकांची कामे झाली आहेत.

या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात येवू नये नव्याने अंदाजपत्रक तयार करण्यात यावे अशी मागणी परदेशी यांनी केली.

या अंदाजपत्रकावर अमिन पटेल, फारुख भैय्या, गंगाधर माळी, संजय जाधव, फारुख शहा, दिनेश शार्दूल, चंद्रकांत सोनार, मनोज मोरे, मायादेवी परदेशी, संदीप पाटोळे, वैभवी दुसाणे, प्रतिभा चौधरी, सतिष महाले, रमेश बोरसे यांनी मते मांडली.

महासभेत आयुक्तांचा सत्कार


आयुक्त सुधाकर देशमुख यांची पहिलीच सभा असल्यामुळे आज महासभेत आयुक्तांचा महापौर सौ. कल्पना महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त गिरासे यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आयुक्त देशमुख यांनी सभागृहाला त्यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. सत्काराप्रसंगी स्थायी सभापती कैलास चौधरी व चंद्रकांत सोनार उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*