देवपूरात माथेफिरूंनी मोटाररसायकल जाळली

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-देवपूरातील मोचीवाडा येथे आज भल्या पहाटे अज्ञात माथेफिरुने घरासमोर लावलेली अ‍ॅक्टीव्हा दुचाकी जाळली.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कन्हैय्या शामलाल साखरे यांच्या मालकीची ही दुचाकी होती. दि.31 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवपुरातील मोचीवाडा येथील संत रविदास समाज भवनमागे राहणार्‍या कन्हैय्या शामलाल साखरे यांच्या मालकीची एमएच 18 एएल 5047 या क्रमांकाची अ‍ॅक्टीव्हा दुचाकी अज्ञात समाजकंटकाने ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळूली.

परिसरात सामसुम असताना अचानक घराबाहेर मोठा आगीचा भडका उडाल्याने साखरे कुटुंबियांना जागा आली तेव्हा परिसरातील नागरीक मदतीसाठी धावले. या घटनेने परिसरात काही काळ गोंधळ उडाला.

लोकांनी पाण्याने आग विझवली. दरम्यान, मात्र तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. या घटनेप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेस मारहाण – उसनवार दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेस मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना धमाणे, ता.धुळे येथे घडली.

याप्रकरणी संशयित दोन महिलांसह तिघांविरुध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लताबाई भगवान बैसाणे (वय 50, रा.धमाणे) या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार उसनवार दिलेले पैसे मागितले त्याचे वाईट वाटल्याने विमलबाई लुका बैसाणे, ताराबाई बाबुराव जाधव, रोहिदास बाबुराव जाधव यांनी संगनमताने लताबाईस मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.

सुझलॉन कंपनीत चोरी – निजामपूर हद्दीतील पंचाळे गावशिवारातील सुझलॉन कंपनीच्या एका टॉवरमधून 32 हजार रुपये किंमतीची वायर चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर निजामपूर पोलिसांत चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पंचाळे गाव शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवर क्र.291 मधुन 32 हजार रुपये किंमतीची 80 फूट वायर चोरट्यांनी चोरुन नेली आहे.

शिवदास झिपरु जगताप या सुझलॉन कंपनीच्या सुपरवायझरने दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*