Type to search

maharashtra धुळे

देवपूरात घरफोडी,चोरट्यांच्या दगडफेकीत एक जखमी

Share
धुळे । शहरातील देवपूर परिसरात काल रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला. चोरट्यांनी एका ठिकाणी घरफोडी करून दागिने लांबविले.तर दुसर्‍या ठिकाणी घरफोडीच्या वेळी चोरट्यांनी शेजारील जाग आलेल्या एकावर दगडफेक केली. त्यात एक जण जखमी झाला असून जखमी झालेल्या इसमाने आरडा-ओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवपुरातील गितांजली सोसायटीत राहणारे आनंद दिवान पवार हे त्यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर राहतात. तर खाली सुनिल बन्सीलाल भामरे हे भाडेकरु म्हणून राहतात. ते कंपनीच्या कामानिमित्त बारामती येथे गेले होते. त्यामुळे घरात त्यांची पत्नी आणि मुले होती. मुले आणि पत्नी बेडरुमध्ये झोपलेले असतांना चोरट्यांनी सुनील भामरे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची ग्रिल काढून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 22 हजारांची रोकड, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला.

त्यानंतर चोरट्यांनी जिटीपी कॉलनी गाठली. तेथील प्लॉट नं.25 अ मध्ये माणिकराव बोरसे हे राहतात. त्यांच्या घराच्या मागील बाजूस प्रफुल्ल अशोक पाटील (वय 45) हे भाडेकरु म्हणून राहतात. पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील खिडकीचा गज वाकवून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिडकीचा गज वाकवितांना आवाज आल्याने प्रफुल्ल पाटील यांना जाग आली. त्यांनी बॅटरीच्या सहाय्याने चोरट्यांवर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे चोरट्यांनी दगडफेक सुरु केली. त्यातील एक दगड प्रफुल्ल पाटील यांच्या पोटाला लागला.

त्यामुळे घाबरून पाटील पळत असतांना खाली पडले. त्यात त्यांचा पायाला इजा झाली आहे. त्यानंतर प्रफुल्ल पाटील यांनी आरडाओरड सुरु केली, त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरट्यांनी गितांजली कॉलनीत घरफोडी करुन चोरलेल्या दीड ग्रॅम वजनाच्या बांगड्या आणि चाव्यांचा गुच्छ चोरटे प्रफुल्ल पाटील यांच्या घराबाहेरच सोडून पळून गेले. दरम्यान घटनास्थळी दारुची बाटली आढळल्याने चोरटे दारुच्या नक्षेत असावे, असा अंदाज बांधला व्यक्त केला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!