Type to search

maharashtra धुळे

देवपुरातील स्मशान भूमीत विद्युत शवदाहिनी बसवा!

Share
धुळे । देवपुर येथील अमरधाम येथे महापालिकेतर्फे विद्युत शवदाहिनी बसवण्यात यावी. अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेचे सहाय्यक उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

शहरात दररोज अनेक जणांचा अनेक कारणांनी मृत्यू होत असतो. तसेच भारतीय हिंदू परंपरे नुसार पार्थीवावर अग्निसंस्कार करण्यात येतो.तसेच एका प्रेताच्या अग्निसंस्कारास किमान दहा वर्षे संगोपन केलेल्या किमान दोन झाडांची कत्तल करण्यात येत असते. यामुळे पर्यावणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. म्हणूनच याबाबत आम्ही धुळेकर संघटनेतर्फे धुळे मनपा प्रशासन अधिकारी श्री.सोनार यांना निवेदन देण्यात आले. देवपुर येथील अमरधाम येथे धुळे महापालिकेकडून विद्युत शवदाहिनी बसवण्यात यावी. अशी आम्ही धुळेकर संघटनेची मागणी आहे. व याबाबत मागील काही महिन्यांपुर्वी देखील धुळे मनपा प्रशासनास संघटने कडून निवेदन देण्यात आले होते.

परंतू सदरच्या निवेदनावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शव दहनासाठी हजारो वृक्षांचा दररोज बळी जातच आहे. म्हणूनच लवकरात लवकर देवपुरच्या अमरधाम येथे विद्युत शव दाहिनी बसवून त्याबाबत शहरातील नागरीकांचे प्रबोधन करावे. तसेच किमान बेवारस प्रेतासाठी तरी विद्युत शव दाहिनीचा उपयोग करावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना संघटना प्रमुख धनंजय गाळणकर, अध्यक्ष कृष्ण बेडसे, जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब कणसे, आप्पा खताळ, हर्षल शिनकर, किशोर बोरसे, अजेश मोरे, रंजना मोरे, अंजली कौर, पारस देवपुरकर, दिनेश आटोळे, सनी भापकर, रंजनाताई नेवे, लोकशाहीर श्रावण वाणी आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!