देवपूरात महिलेची सोनपोत लांबविली

0
धुळे । देवपूरातील वाडीभोकर रोडवरील सुधीर भुसार दुकानाजवळ धुमस्टाईल चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनपोत जबरीने खेचुन नेल्याची घटना काल दि. 13 रोजी सकाळी घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपूरातील बिलाडी रोडवरील एकता नगरातील प्लॉट क्र. 7 मध्ये राहणार्‍या नंदाबाई सुभाष वाकडे (वय 59) या दि. 13 रोजी सकाळी आठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास वाडीभोकर रोडवरील सम्राट पिठाची गिरणीवर पापड तयार करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून पायी शिवाजी नगरकडे येत असतांना सुधीर भुसारसमोर रस्त्याच्याकडेला लिंबाच्या झाडाजवळ दोन अनोळखी इसम दुचाकीवर आले. त्यांनी दुचाकी महिलेच्या समोरून नेवून पुन्हा माघुन येवून त्यांच्या गळ्यावर जोराची थाप मारून गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची एक तोळे वजनाची सोन्याची कंठ माळ जबरीने खेचून नेली. त्यानंतर नंदाबाई यांनी आरडाओरड केली. नागरिका धावून आले. परंतू तोपर्यंत चोरटे धुमस्टाईलने पसार झाले होते.

याप्रकरणी नंदाबाई वाकडे यांनी पश्चिम देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील दोन्ही अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*