‘देशदूत’तर्फे धुळ्यात उद्या ‘ईद मिलन’ कार्यक्रम

0
धुळे । दि.28 । प्रतिनिधी-दै.देशदूततर्फे दि.30 जून 2017 रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील कल्याण भवन येथे ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन करणे ही ‘देशदूत’ची खासीयत राहिली आहे. वर्षभरात शेतकरी मेळावा, ग्रामविकास परिषद आणि सचिन तेंडूलकर चित्रपट महोत्सव यासारखे उपक्रम दै.देशदूततर्फे यशस्वीपणे राबविण्यात आले.

समाजाशी एकरुप होवून वाटचाल करणार्‍या ‘देशदूत’ परिवाराने सर्वधर्मसमभाव जोपासत शहरात ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव जोपासण्याची परंपरा कायम ठेवून ‘देशदूत’ने आयोजित केलेल्या या उपक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

30 जून रोजी शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाशेजारी असलेल्या कल्याण भवनात हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे व पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांची या कार्यक्रमास खास उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या ईदमिलनास उपस्थित रहावे असे आवाहन ‘देशदूत परिवारा’तर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर सव्वाल अन्सारी यांचे सहकार्य लाभले आहे.

 

LEAVE A REPLY

*