गावगुंडांचा बंदोबस्त करा !

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-शहरातील दसेरा मैदान येथील लक्ष्मीवाडी व सहजीवन नगर परिसरातील प्रविण सोनवणे उर्फ बाप्या तलवारे, आकाश प्रविण सोनवणे उर्फ बाल्या पहिलवान, गणेश प्रविण सोनवणे, अमोल प्रविण सोनवणे, नितीन प्रविण सोनवणे, विजय रमेश शिंदे उर्फ टिल्ल्या, संजू गावडे उर्फ बाबा यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून संघटीतपणे दहशत निर्माण केली आहे.
आमच्या विराधात कितीही मोर्चे काढले तरी आम्ही घाबरत नाही अशा प्रकारची धमकी देवून भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत.
त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन परिसरातील रहिवाशी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, दि.13 जून रोजी छोटू झुलाल अहिरे या दलित तरुणाने लहान मुलांचे भांडण मिटविले म्हणून त्याला वरील लोकांनी तलवार व लोखंडी पाईप व बेसबॉलचे दंडे अशा प्राणघातक हत्यारांनी जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत सोडून निघून गेले.

त्यात छोटू अहिरे याच्या डोक्यास, गालावर आणि पायावर तलवारीचे वार झाल्याने डावापायास दुखापत झाली आहे. त्याच्यावर हिरेमेडिकल महाविद्यालयामध्ये उपचार सुरु आहेत.

सदर लोकांकडून टपरीधारक व छोट्या व्यावसायीकांना देखील त्रास दिला जातो. व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली जाते.

सहजीन नगरातील लोकांकडून वर्गणी मागितली जाते. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे.

संबंधितांचा बंदोबस्त करुन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आनंदराव बागुल, सौ.वंदनाताई आनंदराव बागुल, पवन झुलाल अहिरे आदिंसह त्या भागातील नागरिकांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*