धुळ्यात गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतूसे जप्त

0
धुळे । दि.2 । प्रतिनिधी-शहरातील वडजाई रोडवरील चंद्रमणी चौकातून अवैध शस्त्रे जप्ते करण्यात आली.यात एक गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसांचा समावेश आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
धुळे शहरात चंद्रमाणी चौक वडजाई रोड धुळे येथे पवन दिलीप वाघ (वय 29) रा. चंद्रमणी चौक, वडजाई रोड धुळे हा विनापरवाना अवैधरित्या तीन गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुस, एक लोखंडी रॉड, बेस बॉल दंडा असे हत्यार एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या इराद्याने कब्जात बाळगतांना रंगेहात मिळून आला.

आज दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. वाजता राहत्या घरी छापा टाकून एकूण 65 हजार 600 रुपये किमतीचे एकूण तीन गावठी बनावटी पिस्तुल व तीन जीवंत काडतुस, लोखंडी रॉड, बेसबॉल दंडा असे मिळून आले.

त्यांच्याविरुध्द चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे भाग 6 गुरन 54/2017 शस्त्र अधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत, त्या अनुषंगाने देखील तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाणे करीत आहे.

पोलीस अधीक्षक एम. राकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि पी.जे. राठोड, पोसई नासीर पठाण, पोसई दिलीप माळी, पोहेकॉ जितेंद्र आखाडे, पोहेकॉ संदीप थोरात, पोना आरिफ शेख, पोना नितीन महोने, पोकॉ गौतम सपकाळे, पोकॉ. विजय मदने, पोकॉ मायुस सोनवणे, पोकॉ चेतन कंखरे, पोकॉ मनोज बागुल, पोकॉ. कविता देशमुख, पोशि कल्याणी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

LEAVE A REPLY

*