Type to search

Breaking News Featured धुळे फिचर्स

धुळे : मुलाकडून वडिलांचा खून

Share
सावेडी परिसरात युवकाची दगड व धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ, Latest News Savedi Murder Crime News Ahmednagar

धुळे –

आपल्या पत्नीचे आणि वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन मुलाने कुर्‍हाडीचा घाव घालून बापाचा खून केला आहे. ही घटना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर येथे घडली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रमाबाई अत्तरसिंग पावरा (वय 50, रा.कुंबीपाडा, फत्तेपूर, ता.शिरपूर) यांनी शिरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, दि.21 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मुलगा बिनाज्या पावरा (वय 28) याने कोंबडी कापुन भाजी बनविण्यास सांगितले. यासाठी रमाबाई पावरा गावात तेल घेण्यासाठी गेल्या.

मुलगा बिनज्या व सून, नातवंड घरीच होते. तेव्हा रस्त्यात रमाबाई पावरा यांना यांचे पती अत्तरसिंग पावरा भेटले. त्यांना कोबंडीच्या भाजीसाठी तेल आणण्यासाठी चालली असल्याचे सांगितले. हे ऐकून पती अत्तरसिंग पावरा घरी निघून आले. त्यानंतर तेल घेऊन रमाबाई या राजाराम पावरा यांच्या मोटारसायकलीने घरी आल्या. घरी पोहचले असता तेव्हा घरासमोर पती अत्तरसिंग गिलदार पावरा हे मयत पडलेले दिसले.

त्यांचे गळ्याला दुखापत होवून रक्तबंभाळ झालेले होते. मुलगा बिनाज्या याच्या हातात रक्त लागलेली कुर्‍हाड होती. तेव्हा मुलगा बिनाज्या यास विचारले की, तू तुझ्या वडिलांना का मारले? यावर तो म्हणाला, तिला पण कुर्‍हाडीने मारुन टाकेल. त्यानंतर राजाराम यांनी गावातील लोकांना बोलवून आणले. लोकांनी बिनाज्या याच्या हातातील रक्ताने माखलेली कुर्‍हाड हिसकावून घेतली. आपली पत्नी व वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय बिनाज्या याला होता, असे यावेळी समजले. याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात बिनज्या पावरा याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.एस.शेख करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!