Type to search

धुळे मुख्य बातम्या

धुळे : ५० लाखांचे टायर, ट्युब हस्तगत, दोघांना बेड्या

Share

धुळे – 

भिवाडी, राजस्थान येथील एका कंपनीतुन जेसीबी व हारवेस्टर मशीन करीता उपयोगात येणारे टायर्स व ट्युबने भरलेला एक ट्रक (क्र. एच.आर.३८आर ०५५५ ) पुणे येथे माल देण्याकरिता निघाला होता. त्यादरम्यान दि. ८ मे २०१९ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ट्रक हाडाखेड येथील आर.टी.ओ. चेक पोस्ट नाक्यावर ट्रकच्या चालकास एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली. चालकास त्याच्याकडील थंड पेयाद्वारे गुंगीकारक औषध देवून ट्रक मधील एकुण १७१ नग रबरी टायर व टयुब असा ऐवज पळवून नेला होता.

याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सपोनि अभिषेक पाटील यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. त्यानंतर त्यांच्यासह पथकाने गुप्त बातमीदार, विविध ठिकाणातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डीटेल्स व घटनाक्रम यावरुन संशयीत रविराज युवराज फुलमाळी (वय२९.रा.कडोदरा चौफुली कडोदरा ता.पलासना जि.सुरत) व प्रविण आधार शिंपी (वय २८ रा. प्लॉट नं. ८३ माऊलीनगर, वरखेडी रोड,धुळे) यांना अटक केली. चौकशीत दोघांना गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचे सोबत परराज्यात राहणारे इतरही काही साथीदार सहभागी असल्याचे आढळून आले. पोलीस कोठडी दरम्यान वरील दोघांकडून सुमारे ५० लाख ७१ हजार ५६ रुपये किंमतीचे एकुण १५८ जेसीबी व हारव्हेस्टर मशीन करीता वापरण्यात येणारे रबरी टायर व १८१ रबरी टयुब नग असा माल त्यांचे कडून जप्त करण्यात आला आहे. त्यांचे इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सपोनि ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल  उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, पोहेकॉ लक्ष्मण गवळी, संजय देवरे, पोना.संजीव जाधव, पोकॉ योगेश दाभाडे, गोविंद कोळी, योगेश मोरे, शाम पावरा यांनी केलेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!