धुळ्यात भरवस्तीत कुंटणखान्यावर छापा

शहर पोलिसांची कारवाई
धुळ्यात भरवस्तीत कुंटणखान्यावर छापा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरातील सहजीवन नगरात भरवस्तीस छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आज शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

तेथे एक पीडित महिला आढळून आली. याप्रकरणी कुंटणखाना चालविणार्‍या महिलेविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात 2013 नंतर अशाप्रकारची कारवाई प्रथमच करण्यात आली आहे.

शहरातील सहजीवन नगरात एक महिला शहरातील मुलींना पैशाचे आमिष देवुन देह व्यापारास प्रवृत करीत होती.

स्वतःच्या घरात ग्राहकांना बोलावून त्यांना महिला पुरवुन देह व्यापार करवून घेत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. एका खासगी इसमास ग्राहक बनवुन त्याला त्या ठिकाणी पाठविले.

त्याने तेथे देह व्यापार सुरू असल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार तेथे पथकासह छापा टाकत कारवाई केली. या ठिकाणी एका 52 वर्षीय महिला कुंटनखाना चालवित असल्याचे निष्पन्न झाले.

तर एक पीडित महिला मिळुन आली. ती महिला पैशांच्या आमिषापोटी देह व्यापाराचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या महिलेकडून व्यवसायामध्ये जमा झालेले रोख 5 हजार 50 रूपये आणि व्यवसायाशी निगडीत वस्तु पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी पोनि प्रदीप पाडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, असई प्रकाश पाटील, पोना मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, अविनाश कराड, तुषार मोरे, सुशिला वळवी, रंजना चव्हाण, मजरजहा शेख यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com