धुळ्यात दोन कारसह 11 लाखांची दारु जप्त : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
धुळे । शहरातील संतोषी माता चौकात काल दि. 19 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी दोन कारसह 11 लाख 33 हजार 824 रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी दोघांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

होळी, रंगपंचमी सणासाठी अवैधरित्या देशी, विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने हुंडाई क्रेटा कार (क्र. एम.एच.18 बीसी 6243) व वोल्सव्हॅगन कंपनीची हॅटो कारमधून (क्र. एम.एच.39 जे 1939) अनुक्रमे शेख फरीद अब्दुल लफीक (वय 33 रा. मोगाइल, मिशन कंम्पांऊट जवळ, साक्री रोड, धुळे) व रामदास रविदास चत्रे (वय 35 रा. इंदीरागनर वलवाडी, स्टेडीयम जवळ, देवपुर, धुळे) हे दारूची वाहतूक करीत असतांना त्यांना पोलिसांनी संतोषी माता चौकात पकडले. दोन्ही वाहनांसह एकुण 11 लाख 33 हजार 824 रुपये किंमतीची अवैध देशी, विदेशी दारु जप्त केली. दोघांंविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे असई नाना आखाडे, हिरालाल बैरागी, पोहेकॉ प्रकाश पाटील, भिका पाटील, पोना मच्छींद्र पाटील, मुक्तार भन्सुरी, कबीरोद्दीन शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, सतिष कोठावदे, रविंद्र गिरासे, आब्बास शेख, पोकाँ पंकज खैरमोडे, राहुल पाटील, कमलेश सुर्यवंशी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*