Type to search

धुळे फिचर्स

धुळ्यात विवाहितेवर बलात्कार, तिघांवर गुन्हा

Share

धुळे

शहरातील पारोळा रोडवरील एकता हॉटेलच्या मागे शेतात नेवुन विवाहितेवर दोघांनी बलात्कार केल्याच्या घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांसह त्यांना मदत करणार्‍या एकावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मनमाड जीन काझी प्लॉट परिसरात राहणार्‍या 28 वर्षीय पिडीत विवाहितेने आझादनगर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार तिच्या ओळखीचा किरण नामक इसमाने रूम शोधण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने फोन करून तिला शहरातील गिंदोडीया चौकात बोलाविले. तेथे त्याने तिला त्याच्या दुचाकीवर बसवून दोन साथीदारांच्या मदतीने पारोळा रोडवरील एकता हॉटेलच्या मागे शेतात नेले.

तेथे किरण व त्यांच्या मेहंदी कलरचा शर्ट घातलेल्या अनोळखी साथीदार अशा दोघांनी विवाहितेवर बलात्कार केला. तर दोघांच्या या कृत्यास काळा रंगाचा शर्ट घातलेल्या अनोळखी इसमाने मदत व प्रोत्साहन दिले. ही घटना दि. 4 मार्च रोजी रात्री आठ ते दहा वाजेच्य सुमारास घडली. याप्रकरणी वरील तिघांविरूध्द आझादनगर पोलिसात भांदवि कलम 366, 376, 376 (ड) (इ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.

दोघांना अटक
आझादनगर पोलिसांनी गोकुळ दगडु माळी व समाधान बाबुलाल माळी दोघे (रा. अजंग ता. धुळे) यांना सायंकाळी ताब्यात घेतले. दोघांना उद्या दि. 7 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!