Type to search

कचरा जाळण्याचा वाद; दुकानाची तोडफोड

maharashtra धुळे

कचरा जाळण्याचा वाद; दुकानाची तोडफोड

Share
धुळे । शहरातील वाडीभोकर रोडवरील सुयोग नगरात कचरा जाळण्याच्या वादातून दोन गटात मारहाण झाली. तसेच दुकानाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 13 जणांविरुध्द पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाडीभोकर रोडवरील सुयोग नगरात राहणारे राहुल श्रीपाद निकुंभ (वय37) यांनी मयुर दिलीप निकुंभ याला गाडीजवळ कचरा जाळू नको असे सांगितल्याचा राग येवून मयुरने विटा फेकून मारल्या. तर लक्ष्मण फुलसिंग ठाकरे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच शिविगाळ करुन सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात राहुल निकुंभ यांनी दिली. भादंवि 308, 323, 504, 506, 34 प्रमाणे मयुर दिलीप निकुंभ, सतिष शिंदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तर मयुर दिलीप निकुंभ (वय24) याने परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, मला व दुकानात काम करणारा सतिष हरी शिंदे यांना राहुल जोशी याने शिविगाळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काठ्यांनीही मारहाण केली.
दुकानाच्या शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश करुन दुकानाच्या खिडक्यांच्या काचा, सिमेंटचा पत्रा, बॅनर, लायटींग व फर्निचरची तोडफोड करुन नुकसान केले. त्यांच्या तक्रारीवरुन भादंवि 452, 143, 147, 148, 149, 504, 506, 427 प्रमाणे राहुल जोशी व अन्य दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणावर हल्ला- शिरुड, ता. धुळे येथे राहणारे राजू लोटन पवार (वय35) यांच्याशी मागील भांडणाच्या वादातून दि. 12 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता सुरेश सुभाष पवारसह चार जणांनी वाद घालून हाताबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात राजू पवार यांनी फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 323, 504, 506, 34 प्रमाणे सुरेश सुभाष पवार, अंकुश सुभाष पवार, सरलाबाई सुभाष पवार, शोभाबाई सुभाष पवार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात ठार
पिंपळनेर येथे राहणारा सुमंत दादाजी सोनवणे हा एमएच 18 एआर 7936 क्रमांकाची मोटार सायकल नवापूरकडून पिंपळनेरकडे भरधाव वेगाने नेत असतांना समोरुन येणार्‍या एमएच 18 एएल 2983 ला समोरुन येणार्‍या एमएच 18 एएल 2983 क्रमांकाच्या मोटार सायकलीला धडक दिल्याने या अपघातात कृष्णा मधुकर खैरनार रा. पानखेडा हा मयत झाला तर पाठीमागे बसलेला ज्ञानेश्वर सुभाष सोनवणे हा जखमी झाला. तसेच मोटार सायकलीचे नुकसान झाले. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात मधुकर काशिनाथ खैरनार यांनी फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 प्रमाणे सुमंत दादाजी सोनवणे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तलवारीने हल्ला
धुळे शहरातील पारोळा रोडवरील दिल्लीवाला जीन येथे राहणारे कार्तिक जगन्नाथ सूर्यवंशी (वय 26) यांच्याशी दि. 12 मार्च रोजी रात्री 10 वाजता मागील भांडाचा वाद बंटी उर्फ निरज जोशी याने उकरुन काढला व त्यातून सूर्यवंशी यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यावेळी कार्तिक यांची आई व बहिण स्नेहल जगन्नाथ सूर्यवंशी हे तलवारीचा वार वाचविण्यासाठी आले असता त्यांना दुखापत झाली. शिविगाळ करुन घर खाली करा व येथून निघून जा, अशी धमकी देखील दिली. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात कार्तिक जगन्नाथ सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. भादंवि 326, 504, 506, आर्मअ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे बंटी जोशी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!