Type to search

धुळे

लुटीसाठी वाहनावर गोळीबार; गुन्हा दाखल

Share

धुळे | महामार्गावरुन धावणार्‍या स्कार्पिओ वाहनावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून चालकाला बंदुकीचा धाक दाखवून पाच लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न मध्यरात्री झाला. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गुजरातमधील म्हैसाणा जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा येथील कौशिक माणिकलाल पटेल (वय३६) हा चालक एमएच१९ बीयु ४९३१ या स्कार्पिओ गाडीने इतर साथीदारांसह इंदूरहून मुंबईकडे जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी पुलावर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गावठी गट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. तसेच मागावून भरधाव वेगाने आलेली लालरंगाची केट्रा गाडी आडवी लावून गाडीतून उतरलेल्या तिघांनी चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पाच लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!